काही दिवसांपूर्वी fb वर प्रश्न होता तुम्हाला काय वाचायला आवडत. त्यात नेहमीचीच उत्तरे होती कथा कादंबऱ्या आत्म चरित्र वगैरे वगैरे. मलाही हे सगळ वाचायला आवडत पण याही व्यतिरिक्त माझेक आणखी उत्तर होत जे तिथे दिलं नव्हत. माणसे वाचायला. जेव्हा मी ते उत्तर तिथे नव्याने टाकल तेव्हा मला वाटल होत कि या उत्तरला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. पण बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यात जास्त संख्या मुलींची होती हे आवर्जून सांगायला हव.
हो खरच मला माणस वाचायला आवडत. लहानपणा पासूनच माझा हा छंद आहे. मला वाटत कि जितके आपण पुस्तके वाचून समृद्ध होतो तितकेच किंवा त्याहीपेक्षा जास्त आपण माणसे वाचल्याने समृद्ध होतो. सार्वजनिक ठिकाणी असताना जसे बस स्टोप वर असताना, बस मध्ये बसलेले असताना, दवाख्यान्यात बसलेले असताना व तसेच काही. मला माहितीये कि आज च्या या जगात कोणाकडे तितका वेळ नसतो. प्रत्येक जण खूप व्यस्त असतो पण तरीही थोडावेळ इतरत्र बघायला काय हरकत आहे. असेही खूप जणांना सवय असते कि थोडाही वेळ मोकळा मिळाला कि लगेच कानात headphone लावून गाणी ऐकत जगापासून स्वतःला वेगळ करायची. पण जो कसी थोडा वेळ मिळतो आहे तो यात वापरला तर समज वाढते आणि बऱ्याचदा चांगली करमणूकही होते.
म्हणून माझ सांगण आहे कि माणसे वाचायला शिका. यातून खूप आनंद मिळतो.



जुलै 22nd, 2011 at 6:13 pm
प्रत्येकाचे एक एक छंद…वेळ काढून नक्की वाचेन माणसे.
जुलै 22nd, 2011 at 6:57 pm
हो वाचून बघ. खरच खूप मजा वाटते.
मे 22nd, 2012 at 11:54 pm
नक्कीच खुप सुंदर छंद आहे हा
हा छंद जोपासला तर जगाचे,तसे म्हणण्यापेक्षा या कलयुगाचे सत्य समजु लागेल, ते म्हणजे कीत्येक चमचमनार्या कव्हर मध्ये गंजलेल्या वत्सु भरल्या आहेत..।
मे 23rd, 2012 at 11:39 सकाळी
खरंय पण बऱ्याचदा अगदी साध्या कवर मध्ये खूप किमती वस्तू पण असतात, वाचून बघा, आवडेल. प्रतिक्रियेकरता आभार आणि ब्लोगवर स्वागत.