आजच एक डोंबारयाचा खेळ पहिला आणि सहज विचार करता करता फार पूर्वी ऐकलेली एक कथा आठवली. प्रत्येकाने नेहमी आठवावी अशी आहे. म्हणून इथे लिहावीशी वाटली.
देवाने मलाच का दुख दिलं, इतर कसे सुखी आहेत असा प्रश्न प्रत्येकालाच कधी न कधी पडतो. अशाच सततच्या प्रश्नांना कंटाळलेल्या देवाने एकदा माणसांना एक सवलत देऊ केली. त्याने सांगितले कि प्रत्येकाला आपापले दुख इतरांच्या दुखासोबत बदलून घेता येईल पण त्यानंतर मात्र आयुष्यभर त्याला त्या नव्या दुखासोबत जगावे लागेल. आपल्या वाटेला आलेल्या त्रासाला कंटाळलेल्या लोकांनी ते मान्य केले.
मग देवाने त्यांना सांगितले कि प्रत्येकाने आपले दुख नीट बांधून आणायचे आणि एका मोठ्या झाडाखाली ठेवायचे. नंतर आपले सोडून इतरांच्या दुखापैकी कोणतेही उचलायचे. सगळ्यांनी तसेच केले. पण जेव्हा ते उघडून पहिल तेव्हा मात्र प्रत्येकाला मिळालेलं दुख पाहून भोवळच आली, वाटल आपल तेच बर होत.सगळ्यांनी देवाला विनंती केली कि आम्हाला आमचेच भोग भोगू दे, इतरांचे नको.
तात्पर्य – इतरांच जे दुख लांबून सौम्य वाटत ते प्रत्यक्षात किती दाहक असतं ते जवळ गेल्यावरच कळत.





जानेवारी 5th, 2012 at 3:44 pm
hmmm…
durun dongar sajare….
chan aahe lekh
जानेवारी 8th, 2012 at 12:31 pm
pratikriyebaddal abhar!!
जानेवारी 15th, 2012 at 11:27 pm
खर आहे. पण दुसर्याच्या सुखामागे किती दुख लपलेल आहे हे सुध्दा ते सुख उपभोगयला मिळाल्यवरच कळत नाही का! दुरुन डोंगर साजरे ही म्हण सुख आणि दुख दोन्ही परिस्थितित लागु आहे हे विसरु नये मानसाने!!
जानेवारी 20th, 2012 at 10:23 pm
pratikriyebaddal abhar!!!