थोडंस वेगळ काहीतरी …


काही वाक्य मनात अगदी घर करून जातात. म्हणून अशी वाक्य टिपून इथे द्यावीशी वाटली. तुम्हीही कधीतरी ऐकली असतीलच. बघा कशी वाटतात.

१. ज्या वाटेने यश मिळाल ती वाट मुद्दाम पायात बांधून ठेवावी लागते. ती विसरून जायचे नसते.

हे वाक्य ‘आई शप्पथ’ या मराठी चित्रपटातलं आहे.

२. झूठ बोलते है वो लोग जो कहते है उन्हे डर नाही लागता. डर के आगे जीत है.

हे कुठल्यातरी ad  मधलं आहे. पण अर्थपूर्ण आहे.

३. सिर्फ दो पाहीयोन का फरक है uncle वो भी आ जायेंगे.

क्योंकी अगला ball भी sixer हि होगा.

हि दोन्ही वाक्य सुद्धा एका ad मधली आहेत. तुम्ही ऐकली असतीलच.

४. आदमी मशीन बना होले होले

हे सुद्धा ad  मधलं आहे. I.T. मधल्या लोकांना तर हे नक्की पटत असेल.

५. जिंदगी का मजा थोडासा बिगडणे मै हि है. हमेशा अच्चा बने रहने मै नही.

चुकीच्या अर्थाने घेऊ नका बरंका.

६. वाहिली ती गंगा आणि राहील ते तीर्थ.

आमच्या सरांचं वाक्य.

७. मी काय मुलगी आहे का B.Sc . M.Sc . करून लग्नासाठी base तयार करायला.

‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ मधले वाक्य जरा जास्तच लागलं.

८. बेटी कि हजार गलतिया माफ मगर बहु कि एक गलती भी माफ नही होती.

Advertisements

2012 बद्दल तुमचं मत …


खर कि खोट कुणाला माहित पण net वर याबद्दल खूप वाचायला मिळत. म्हणून म्हटलं कि चर्चा करावी. शिवाय Y/A ( yahoo answers ) वर पण खूप प्रश्न येत असतात. अगदी नेहमी. खूप भीती आहे लोकांमध्ये याबद्दल. त्यातच Hollywood मध्ये कोणत्याही प्रसंगावर लगेच film काढायची पद्धतच आहे बहुतेक. यावर सुद्धा 2012 नावाची फिल्म आणली आहे. बघितली नाही अजून पण वाटते कि चांगली असणार.

असो, आपलं wikipedia is best. लगेच बरीच माहिती सापडते. mayan calender आणि मध्येच solar maximum बद्दल पण वाचण्यात आलं होत. you tube वर पण काहीतरी सापडत असत २०१२ बद्दल. खाली देत आहे. आणखी पुढच्या वेळेला scientific knowledge मिळवून मग बोलायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत आपलं मत अपेक्षित आहे.

(Unfortunate) Comparison between India & …..


हो खरच unfortunate ! पण काय करणार खर ते खर.

तुमच्यापैकी खूप जण नेहमी out of country जात येत असत असाल. मी कधीही गेलेले नाही. पण तरीही हा फरक जाणवतोच. कधी कधी paper मध्ये काही articles वाचून हा फरक प्रकर्षाने जाणवतो. खूप वाईट वाटत. मध्ये जपान बद्दल वाचाल होतं. तिथे खूप चोऱ्या व्हायच्या म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली.प्रत्येकाने घराबाहेर खूप फुलझाडे लावली. त्यामुळे चोऱ्या कमी झाल्या. कशा तर त्या झाडांना पाणी द्यायला त्यांची काळजी घ्याला लोक जास्त घराबाहेर पडायला लागले, त्यांचा बाहेर वावर वाढला आणि चोऱ्या कमी झाल्या. शिवाय area सुंदर झाला ते वेगळंच!!वाचून वाटल आपल्याकडे हे कधी कोणी केल तरी दुसऱ्याच दिवशी फुलं झाडावर दिसणार नाहीत आणि भांडण होण्याची शक्यता वाढेल.

मध्ये आणखी वाचलं होत कि France मध्ये (त्यांच्या मते!) त्यांची येणाऱ्या visitors शी वागणूक चांगली नाही. म्हणून visitors ना चांगल वातावरण बघायला मिळावं यासाठी त्यांनी काही लोकांना ठिकठिकाणी उभं करून येणारयांशी हसायला सांगितलं. आणि त्यासाठी तिथले स्वयंसेवक तयारही झाले. आपल्याकडे सरकारला स्वतः ad दाखवून ( तेही Amir Khan ला घेवून) लोकांना सांगावं लागत कि ‘ अरे ते आपले पाहुणे आहेत त्यांच्याशी चांगल वागा ‘. आणि म्हणे अतिथी देवो भवं.

बाहेरच्या देशांमध्ये India ची प्रतिमा वाईट आहे याचा पुरावा म्हणजे तिथल्या guide books मध्ये mention केलेलं असत म्हणे कि India तं जाताना सावधान राहा. एका पुस्तकामध्ये वाचला होतं. ते पुस्तक एका वयस्कर मराठी व्यक्तीने ( Mr. साठे) त्यांच्या जपान प्रवासाबद्दल आणि अनुभवाबद्दल लिहील आहे. त्यांच्याकडे एक जपानी मुलगी राहायला आली होती. तिच्याकडच्या guidebook मध्ये एक photo होतं. त्यात एक माणूस खिडकीतून काठी घालून purse चोरताना दाखवला होतं आणि वर लिहील होतं ‘ चोरांपासून सावध राहा.’ वाईट वाटत हे पाहून !! त्यांचे कडे मात्र कोणीही केव्हाही ( अगदी रात्रीही शहरात फिरू शकते.) अर्थात माझे वडील जपान मध्ये गेले होते तेव्हा त्यांना तिथल्या लोकांनी काही लोकांपासून सावध राहायला सांगितलं होतं पण नक्कीच आपल्या इतक वाईट नाही तिथे.

तिथल्या स्वच्छतेबद्दल तर बोलाव तितक कमीच. आपला area सुंदर दिसावा म्हणून तिथले लोक विजेच्या खांबावर प्लास्टिकच्या वेली स्वतःच्या खर्चाने टाकतात. ते बघून वाटत कि कधी आपला देश पण इतका सुंदर होईल. किती छान वाटेल ना!!

तिथल्या लोकांची स्वयंशिस्त वाखाणण्यासारखी आहे. तिथे overtime हा प्रकारच माहित नाही म्हणे. तिथल्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात कि ज्याच काम वेळेत पूर्ण झालं नाही ते त्यांनी स्वतः थांबून पूर्ण करायचं असत. त्यासाठी overtime ची काय गरज! Work comes first ! आणि बंद करण्याची पद्धत पण अनोखी आहे. हातावर काळी फीत लावून काम करतात किंवा वाजवीपेक्षा जास्त काम करतात. काही आंदोलन नाही कि अडवून धरणं नाही. आणि त्यांच्या या बंद मुळे पण त्यांचे वरिष्ट अधिकारी अस्वस्थ होतात ( आश्चर्यच आहे ना ! म्हणतात एका हाताने टाळी वाजत नाही. आपल्याकडे असं आंदोलन केल तर त्यांच्याकडे कोणी बघणार पण नाही.)

अंततः आपल्याकडेही येत्या काही वर्षात काही अमुलाग्र बदल घडून येतील अशी अपेक्षा करू.

[Note: I am proud be an Indian. पण तरीही मन नकळत तुलना करतंच. म्हणूनच वरती म्हटलं आहे ‘UNFORTUNATE’. असो सुधारणा करणं आपल काम आहे. प्रयत्न करूया. नक्कीच तो दिवस येईल जेव्हा US or UK ला जाण्यासारख India मध्ये येण सुद्धा प्रतिष्ठेच मानल जाईल आणि कोणीही slamdog करोडपती बनवणार नाही.]

mumbai-lg