मुखपृष्ठ » Uncategorized » (Unfortunate) Comparison between India & …..

(Unfortunate) Comparison between India & …..

हो खरच unfortunate ! पण काय करणार खर ते खर.

तुमच्यापैकी खूप जण नेहमी out of country जात येत असत असाल. मी कधीही गेलेले नाही. पण तरीही हा फरक जाणवतोच. कधी कधी paper मध्ये काही articles वाचून हा फरक प्रकर्षाने जाणवतो. खूप वाईट वाटत. मध्ये जपान बद्दल वाचाल होतं. तिथे खूप चोऱ्या व्हायच्या म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली.प्रत्येकाने घराबाहेर खूप फुलझाडे लावली. त्यामुळे चोऱ्या कमी झाल्या. कशा तर त्या झाडांना पाणी द्यायला त्यांची काळजी घ्याला लोक जास्त घराबाहेर पडायला लागले, त्यांचा बाहेर वावर वाढला आणि चोऱ्या कमी झाल्या. शिवाय area सुंदर झाला ते वेगळंच!!वाचून वाटल आपल्याकडे हे कधी कोणी केल तरी दुसऱ्याच दिवशी फुलं झाडावर दिसणार नाहीत आणि भांडण होण्याची शक्यता वाढेल.

मध्ये आणखी वाचलं होत कि France मध्ये (त्यांच्या मते!) त्यांची येणाऱ्या visitors शी वागणूक चांगली नाही. म्हणून visitors ना चांगल वातावरण बघायला मिळावं यासाठी त्यांनी काही लोकांना ठिकठिकाणी उभं करून येणारयांशी हसायला सांगितलं. आणि त्यासाठी तिथले स्वयंसेवक तयारही झाले. आपल्याकडे सरकारला स्वतः ad दाखवून ( तेही Amir Khan ला घेवून) लोकांना सांगावं लागत कि ‘ अरे ते आपले पाहुणे आहेत त्यांच्याशी चांगल वागा ‘. आणि म्हणे अतिथी देवो भवं.

बाहेरच्या देशांमध्ये India ची प्रतिमा वाईट आहे याचा पुरावा म्हणजे तिथल्या guide books मध्ये mention केलेलं असत म्हणे कि India तं जाताना सावधान राहा. एका पुस्तकामध्ये वाचला होतं. ते पुस्तक एका वयस्कर मराठी व्यक्तीने ( Mr. साठे) त्यांच्या जपान प्रवासाबद्दल आणि अनुभवाबद्दल लिहील आहे. त्यांच्याकडे एक जपानी मुलगी राहायला आली होती. तिच्याकडच्या guidebook मध्ये एक photo होतं. त्यात एक माणूस खिडकीतून काठी घालून purse चोरताना दाखवला होतं आणि वर लिहील होतं ‘ चोरांपासून सावध राहा.’ वाईट वाटत हे पाहून !! त्यांचे कडे मात्र कोणीही केव्हाही ( अगदी रात्रीही शहरात फिरू शकते.) अर्थात माझे वडील जपान मध्ये गेले होते तेव्हा त्यांना तिथल्या लोकांनी काही लोकांपासून सावध राहायला सांगितलं होतं पण नक्कीच आपल्या इतक वाईट नाही तिथे.

तिथल्या स्वच्छतेबद्दल तर बोलाव तितक कमीच. आपला area सुंदर दिसावा म्हणून तिथले लोक विजेच्या खांबावर प्लास्टिकच्या वेली स्वतःच्या खर्चाने टाकतात. ते बघून वाटत कि कधी आपला देश पण इतका सुंदर होईल. किती छान वाटेल ना!!

तिथल्या लोकांची स्वयंशिस्त वाखाणण्यासारखी आहे. तिथे overtime हा प्रकारच माहित नाही म्हणे. तिथल्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात कि ज्याच काम वेळेत पूर्ण झालं नाही ते त्यांनी स्वतः थांबून पूर्ण करायचं असत. त्यासाठी overtime ची काय गरज! Work comes first ! आणि बंद करण्याची पद्धत पण अनोखी आहे. हातावर काळी फीत लावून काम करतात किंवा वाजवीपेक्षा जास्त काम करतात. काही आंदोलन नाही कि अडवून धरणं नाही. आणि त्यांच्या या बंद मुळे पण त्यांचे वरिष्ट अधिकारी अस्वस्थ होतात ( आश्चर्यच आहे ना ! म्हणतात एका हाताने टाळी वाजत नाही. आपल्याकडे असं आंदोलन केल तर त्यांच्याकडे कोणी बघणार पण नाही.)

अंततः आपल्याकडेही येत्या काही वर्षात काही अमुलाग्र बदल घडून येतील अशी अपेक्षा करू.

[Note: I am proud be an Indian. पण तरीही मन नकळत तुलना करतंच. म्हणूनच वरती म्हटलं आहे ‘UNFORTUNATE’. असो सुधारणा करणं आपल काम आहे. प्रयत्न करूया. नक्कीच तो दिवस येईल जेव्हा US or UK ला जाण्यासारख India मध्ये येण सुद्धा प्रतिष्ठेच मानल जाईल आणि कोणीही slamdog करोडपती बनवणार नाही.]

mumbai-lg

Advertisements

5 thoughts on “(Unfortunate) Comparison between India & …..

    • Totally agree with you and thanks for your comment. This is first comment on my blog so I am happy. And ‘ Oranges and Apples cant be compared ‘छान आहे. पण अशी आशा करूया कि कधी तरी हे शक्य होईल. Any way, welcome to my blog.

  1. agree with above comments. Our country is still developing country which cannot be compared with already developed countries. But yes,the rate at which already developed countries got developed is something to think about. Germany, Japan showed the developments in no time. We fail big time in that aspect. There is this big diversity in India and the main problem is the Population!
    Anyways.. it feels bad when we compare, I completely agree. I always think too, why this cannot be done in India! nevertheless let’s ope for the best!

    • मलासुद्धा मान्य आहे कि compare करणं योग्य नाही पण तरीही आपण दुसर्यांकडून चांगल घेऊन आपल्यात बदल करण्यात काही चुकीच आहे असा मला वाटत नाही. आपल्याकडे खरतर प्रत्येकाने जर आपापली जबाबदारी समजून घेऊन पूर्ण केली तर नक्कीच आपल्या देशाला मदत होईल.
      असो तुमचं माझ्या blog वर स्वागत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s