हा चित्रपट बघा, नक्की


200px-Envy_film_poster खरच चित्रपट खुप छान आहे. कॉमेडी आहे अणि नुसता कॉमेडी नसून माणसाच्या स्वभावावर भाष्य करणारा देखिल आहे. नक्की आवडेल असा आहे.

Advertisements

नीतिमत्ता


काय heading  द्याव तेच कळत नव्हत पण म्हटलं matter  जास्त महत्वाचा आहे. मला एक सवय आहे किंवा मग छंद आहे म्हणा पण मला लोकांना जाणून घ्यायला खूप आवडतं. public  places  मध्ये असताना लोकांना observe  करायला आवडतं (पण कोणालाही कळणार नाही अशा तर्हेने). अशाने खूप वेग-वेगळे स्वभाव कळतात.

हा सुद्धा असाच एक प्रसंग आहे.  तारीख होती ३० sept  २००९. मी बसमध्ये होते. एका stop वर बस थांबली आणि एक लहान मुलगा आणि त्याचे वडील बसमध्ये चढले. मुलगा लहान म्हणजे १० – १२ वर्षांचा असेल. त्यांच्याकडे बघून ते खूप गरीब घरातले असावेत असे वाटत होते. त्यांचे कपडे सुद्धा फाटलेले होते. कष्टकरी असावेत. अशा लोकांकडे बघून आपला गैरसमज होतो.

बस मध्ये दोनच seats रिकाम्या होत्या. एका seat वर एक माणूस बसलेला होता आणि एका seat वर एक कॉलेजची मुलगी बसलेली होती. ती मुलगी ११ वी -१२ वी ची असेल. त्या माणसाने दोन्ही seats  कडे पाहिलं. आणि स्वतः त्या माणसाच्या seat  वर बसला आणि त्या मुलाला पुढे बोलावलं त्या दुसर्या seat  वर बसायला. तो मुलगा एवढा लहान असून सुद्धा त्या seat  वर बसायला नाही म्हणत होता. तरीही नंतर त्याच्या वडिलांनी म्हटल्यामुळे बसला. बसला सुद्धा असा कि अगदी टोकाला, अंग चोरून. पुढच्याच stop  ला बस थोडीशी रिकामी झाली आणि तो लगेच रिकाम्या seat वर जाऊन बसला.

घटना अगदी शुल्लक आहे आणि अगदी काही मिनिटांचीच. पण मला वाटत कि याचा अर्थ मात्र खूप मोठा आहे. आजकाल चांगल्या घरातल्या लोकांचा सुद्धा काही भरवसा नसतो पण अशा गरीब लोकांमध्ये अशी नितीमत्ता बघून चांगल वाटत.

Kids