मुखपृष्ठ » Uncategorized » नीतिमत्ता

नीतिमत्ता

काय heading  द्याव तेच कळत नव्हत पण म्हटलं matter  जास्त महत्वाचा आहे. मला एक सवय आहे किंवा मग छंद आहे म्हणा पण मला लोकांना जाणून घ्यायला खूप आवडतं. public  places  मध्ये असताना लोकांना observe  करायला आवडतं (पण कोणालाही कळणार नाही अशा तर्हेने). अशाने खूप वेग-वेगळे स्वभाव कळतात.

हा सुद्धा असाच एक प्रसंग आहे.  तारीख होती ३० sept  २००९. मी बसमध्ये होते. एका stop वर बस थांबली आणि एक लहान मुलगा आणि त्याचे वडील बसमध्ये चढले. मुलगा लहान म्हणजे १० – १२ वर्षांचा असेल. त्यांच्याकडे बघून ते खूप गरीब घरातले असावेत असे वाटत होते. त्यांचे कपडे सुद्धा फाटलेले होते. कष्टकरी असावेत. अशा लोकांकडे बघून आपला गैरसमज होतो.

बस मध्ये दोनच seats रिकाम्या होत्या. एका seat वर एक माणूस बसलेला होता आणि एका seat वर एक कॉलेजची मुलगी बसलेली होती. ती मुलगी ११ वी -१२ वी ची असेल. त्या माणसाने दोन्ही seats  कडे पाहिलं. आणि स्वतः त्या माणसाच्या seat  वर बसला आणि त्या मुलाला पुढे बोलावलं त्या दुसर्या seat  वर बसायला. तो मुलगा एवढा लहान असून सुद्धा त्या seat  वर बसायला नाही म्हणत होता. तरीही नंतर त्याच्या वडिलांनी म्हटल्यामुळे बसला. बसला सुद्धा असा कि अगदी टोकाला, अंग चोरून. पुढच्याच stop  ला बस थोडीशी रिकामी झाली आणि तो लगेच रिकाम्या seat वर जाऊन बसला.

घटना अगदी शुल्लक आहे आणि अगदी काही मिनिटांचीच. पण मला वाटत कि याचा अर्थ मात्र खूप मोठा आहे. आजकाल चांगल्या घरातल्या लोकांचा सुद्धा काही भरवसा नसतो पण अशा गरीब लोकांमध्ये अशी नितीमत्ता बघून चांगल वाटत.

Kids

Advertisements

2 thoughts on “नीतिमत्ता

  1. माझाही असाच अनुभव आहे.
    डबलडेकर बसमध्ये मी वरच्या डेकवर बसले होते.माझ्या बाजुला अगदी साधासा असा एक मील कामगार बसला होता.माझा स्टॉप जवळ येण्यापुर्वी खालून भांडणाचे आवाज,शिवीगाळ ऐक़ू यायला लागली.काही लोकांना कंडक्टर वरच्या डेकवर येऊ देत नव्हता कारण जागा नव्हती आणि काही लोक ऊभेही होते.माझा स्टॉप आला तेव्हा माझ्या बाजुचा कामगार मला म्हणाला,” ताई तुम्ही इतक्यात ऊतरू नका, खालची लोकं बरी नाहीत आणि त्यांची डोकी पण गरम झालीत ;कदाचीत तुम्हाला धक़्क़ाबुक्की करतील,थोडं पुढे उतरा नी मग़ परत मागे या ते बरं होईल” पण मला घरी जायची घाई होती म्हणुन मी म्हटलं “काका मला जायलाच पाहीजे,मी पहातॅ कसं उतरायचं ते” हे ऐकल्यावर तो स्वतःच उठून ऊभा राहीला आणि म्हणाला ‘चला तर मी पण उतरणारच आहे तुम्ही माझ्या मागुन उतरा” हे ऐकल्यावर मला त्याच्या मनाचा मोठेपणा कळला,तो खरं तर माझ्या नंतर २र्या स्टॉपवर उतरणार होता पण केवळ एक माणुसकी म्हणुनच मला खाली नीट पोहचवण्यासाठीच तो आधी उतरला.हे असे अनुभव आले की वाटतं पैसा नसलेल्या लोकांकडेच कधी कधी जास्त मोठी माणुसकी असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s