माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस


हे माझ्या आयुष्यातलं पाहिलं बक्षीस. इथे मी स्वतः चं कौतुक करतेय असं वाटेल कदाचित पण खरच मला खूप आनंद झाला आहे आणि तो share करण्यासाठीच मी हि post लिहितेय. शेवटी हि माझी डायरीच आहे ना. मग सगळ्या महत्वाच्या गोष्टींची नोंद इथे व्हायला नको का?

तर गेले दोन दिवस म्हणजे २२ आणि २३ तारखेला आमच्या कॉलेजमध्ये येळकोट फेस्टिवल चालू होता.

आमच्याकडे वेग वेगळे festival होत असतात. म्हणजे arts festival , commerce festival . तसाच हा science festival . (अर्थात याबद्दल मी एवढ्या हक्काने बोलू नये . कारण मलादेखील हे आत्ताच माहित पडल आहे.) त्यात असणाऱ्या art gallery मध्ये मी (माझ्या मेत्रीणीन मुले) स्वतः काढलेलं sketch ठेवलं (अपघातानेच) आणि मला (तेही अपघातानेच असाव कदाचित) second prize मिळाल. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पाहिलं prize आहे आणि मला हे सांगायला आनंद होत आहे कि ते मला माझ्या सगळ्यात आवडत्या गोष्टीसाठी मिळाल आहे आणि म्हणूनच ते इतक खास आहे.

खूप झाल माझ कौतुक. आता जरा कार्यक्रमाविषयी बोलूया. कार्यक्रम खरच खूप छान झाला. पण सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे हा सगळ कार्यक्रम तिसर्या वर्षाच्या ( म्हणजे आमच्या पेक्षा लहान ) विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीशिवाय स्वतः arrange केला आणि सुंदर निभावला. त्यांचं कौतक कराव तितक थोडंच आहे. आणि आमच्या the anchor of the college आणि the singers of the college चे तर किती कौतुक करावे. अप्रतिम!! खरच असे प्रोग्राम होण गरजेच असत. कारण त्यातून खूप शिकायला मिळत.

आता सरते शेवटी जयघोष करावासा वाटतोय

येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट

Sketches :


Advertisements

अलविदा… असं म्हणू नये


सगळ्यात आधी sorry अनिकेत दादा तुझ्या post चे heading वापरल्याबद्दल. आणि खर तर विषयसुद्धा तोच आहे. फक्त उद्देश वेगळा आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जो धक्का अनिकेत दादा ने दिला त्यामुळे मला हि पोस्ट लिहावीशी वाटली.

सगळ्यात आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कि तुम्ही blogging का करता? मी प्रश्न विचारला म्हणजे पहिले मी उत्तर द्यायला हवं. माझं उत्तर असं कि खूप वर्षांपासून मला माझी डायरी लिहावी अस मनापासून वाटायचं पण लिहायचा कंटाळा यायचा. विचार एकदा मनात यायला लागले कि ते ब्रेक नसलेल्या, फुल स्पीड ने धावणाऱ्या गाडीसारखे सुटतात. मग या विचारांवर कुणाच तरी मत हवं असत. पण खर सांगू आपले हे विचार ऐकायला कुणीही तयार होत नसत. सगळ्यांना bore होत  आणि म्हणतात पकवू नकोस, please!! त्यांच्या या विनंती वजा आदेशाचा मन राखून आपली ढाल तलवार मागे घ्यावी(च) लागते.

अशातच मला अगदी अनपेक्षितपणेच काही मराठी ब्लोग वाचायला मिळाले. मला ते वाचायला खूप आवडले. मग विचार केला कि आपण आपले विचार, अनुभवच ब्लोग वर का लिहू नये? (तसा ब्लोग आधीपासूनच सुरु केला होता पण काही लिहिले नव्हते.) सगळ्यात महत्वाच म्हणजे इथे कोणाला वाचायला आवडलं तर ते वाचतील, नाही आवडलं तर निघून जातील पण रागावणार नाहीत, कोणी टोकणार नाही. झाल्याच तर ओळखी होतील. मागेही कुठेतरी वाचल होत कि ब्लोग हि कल्पना personal डायरी वरूनच सुचली होती म्हणून.

तर मूळ मुद्दा राहिलाच बाजूला. मी जेव्हा माझ्या पप्पांना ब्लोग  लिहायला सांगितला तेव्हा तेव्हा माझ्या मनात होत कि त्यांना सुद्धा आपल्या मनातले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. पण जेव्हा त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि ब्लोग वाचला जाऊ लागला तेव्हा रोज पोस्ट लिहिलीच पाहिजे असं जणू अलिखित नियमच झाला. ब्लोग fastest growing च्या लिस्ट मध्ये आला पाहिजे,रंकिंग मध्ये वर गेला पाहिजे वगैरे वगैरे असे त्यांना वाटू लागले. ब्लोग्गिंग एक व्यसन होऊ लागले.

पण खर सांगू मला हे नाही पटत. माझ्या मते ब्लोग हा आपल मन मोकळ करण्यासाठी, लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. पण ते व्यसन बनता कामा नये. ब्लोगवरील नकाशावर किती dots आहेत, वाचकांची संख्या किती आहे यापेक्षा लोक तुमचा ब्लोग किती आवडीने वाचतात, त्यांना तुमचे विचार किती पटतात हे जास्त महत्वाच आहे. आताच महेंद्र काकांच्या ब्लोगची वाचकसंख्या लाखाच्या वर पोहोचली, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. पण मला वाटत कि त्यांच्या वाचकांचा आकडा नुसता visitors नि फुगलेला नसून त्यात सारे खरे मनापासून दाद देणारे वाचक आहेत आणि हेच जास्त महत्वाचेआहे.

सरतेशेवटी माझ  हेच म्हणण आहे कि please ब्लोग लिहिणे बंद करून आपल्या नियमित वाचकांना धक्का देऊ नका.

Blogging must be your Hobby, but not your Passion.

तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा