मुखपृष्ठ » Blogging » अलविदा… असं म्हणू नये

अलविदा… असं म्हणू नये

सगळ्यात आधी sorry अनिकेत दादा तुझ्या post चे heading वापरल्याबद्दल. आणि खर तर विषयसुद्धा तोच आहे. फक्त उद्देश वेगळा आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जो धक्का अनिकेत दादा ने दिला त्यामुळे मला हि पोस्ट लिहावीशी वाटली.

सगळ्यात आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कि तुम्ही blogging का करता? मी प्रश्न विचारला म्हणजे पहिले मी उत्तर द्यायला हवं. माझं उत्तर असं कि खूप वर्षांपासून मला माझी डायरी लिहावी अस मनापासून वाटायचं पण लिहायचा कंटाळा यायचा. विचार एकदा मनात यायला लागले कि ते ब्रेक नसलेल्या, फुल स्पीड ने धावणाऱ्या गाडीसारखे सुटतात. मग या विचारांवर कुणाच तरी मत हवं असत. पण खर सांगू आपले हे विचार ऐकायला कुणीही तयार होत नसत. सगळ्यांना bore होत  आणि म्हणतात पकवू नकोस, please!! त्यांच्या या विनंती वजा आदेशाचा मन राखून आपली ढाल तलवार मागे घ्यावी(च) लागते.

अशातच मला अगदी अनपेक्षितपणेच काही मराठी ब्लोग वाचायला मिळाले. मला ते वाचायला खूप आवडले. मग विचार केला कि आपण आपले विचार, अनुभवच ब्लोग वर का लिहू नये? (तसा ब्लोग आधीपासूनच सुरु केला होता पण काही लिहिले नव्हते.) सगळ्यात महत्वाच म्हणजे इथे कोणाला वाचायला आवडलं तर ते वाचतील, नाही आवडलं तर निघून जातील पण रागावणार नाहीत, कोणी टोकणार नाही. झाल्याच तर ओळखी होतील. मागेही कुठेतरी वाचल होत कि ब्लोग हि कल्पना personal डायरी वरूनच सुचली होती म्हणून.

तर मूळ मुद्दा राहिलाच बाजूला. मी जेव्हा माझ्या पप्पांना ब्लोग  लिहायला सांगितला तेव्हा तेव्हा माझ्या मनात होत कि त्यांना सुद्धा आपल्या मनातले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. पण जेव्हा त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि ब्लोग वाचला जाऊ लागला तेव्हा रोज पोस्ट लिहिलीच पाहिजे असं जणू अलिखित नियमच झाला. ब्लोग fastest growing च्या लिस्ट मध्ये आला पाहिजे,रंकिंग मध्ये वर गेला पाहिजे वगैरे वगैरे असे त्यांना वाटू लागले. ब्लोग्गिंग एक व्यसन होऊ लागले.

पण खर सांगू मला हे नाही पटत. माझ्या मते ब्लोग हा आपल मन मोकळ करण्यासाठी, लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. पण ते व्यसन बनता कामा नये. ब्लोगवरील नकाशावर किती dots आहेत, वाचकांची संख्या किती आहे यापेक्षा लोक तुमचा ब्लोग किती आवडीने वाचतात, त्यांना तुमचे विचार किती पटतात हे जास्त महत्वाच आहे. आताच महेंद्र काकांच्या ब्लोगची वाचकसंख्या लाखाच्या वर पोहोचली, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. पण मला वाटत कि त्यांच्या वाचकांचा आकडा नुसता visitors नि फुगलेला नसून त्यात सारे खरे मनापासून दाद देणारे वाचक आहेत आणि हेच जास्त महत्वाचेआहे.

सरतेशेवटी माझ  हेच म्हणण आहे कि please ब्लोग लिहिणे बंद करून आपल्या नियमित वाचकांना धक्का देऊ नका.

Blogging must be your Hobby, but not your Passion.

तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा25 thoughts on “अलविदा… असं म्हणू नये

 1. हम्म, मस्त पोस्ट आहे. खरं तर ब्लॉगींग ही माझी सुध्दा आधी हॉबीच होती, पण बघता बघता त्याचे पॅशन कधी झाले ते कळालेच नाही आणि मग ब्लॉग लिहीला नाही की खुप बैचैन व्हायला व्हायचे. नकळत स्वतःसाठिच एक अपराधीपणाची भावना यायची. त्यात माझे ब्लॉगींग म्हणजे बहुदा कथानकांशी संबंधीत होते. सो.. खंड पडला की उगाचच वाटायचे वाचक खोळंबले आहेत पुढचा भाग वाचण्यासाठी आणि त्यामुळे एक-दोनदा चक्क पाट्या टाकल्या गेल्या माझ्याकडुन जे माझं मलाच पटलं नाही.

  म्हणुन मग ठरवलं, उगाचच काहीतरी खरडण्यापेक्षा न लिहीलेलेच बरं.पण वाचकांच्या अलविदा पोस्टवरच्या प्रतिक्रिया वाचुन जाणवलं की मी फारच स्वार्थीपणे निर्णय घेतोय आणि वर्क-अरांऊंड म्हण हवं तर पण ब्लॉग डिलीट नाही करणार पण पोस्टची संख्या खुपच मर्यादीत राहील.

  कथानक सुध्दा यापुढे माझ्याकडुन पुर्ण झाल्यावरच एकदम पोस्ट करीन. ब्लॉग पॅशन न रहाता त्याची ‘पॅशनेट हॉबी’ करता आली तर बघतो.

  बाकी गोडं शब्दात अंजन पडलं बरका डोळ्यात. आणि माझी कलाकृती तर फॅन्टास्टीकच.

  • अनिकेत
   मी पण हे पोस्ट चार वेळा वा्चलंय, आणि विचारात पडलो होतो की मी पण ऍडिक्ट आहे कां? आणि उत्तर मिळालं …. हो…!!
   सुरुवातीला हॉबी ( मे बी पुरु्षी अहं असावा(?) बायको लिहिते नां.. मग मी का नाही???असं असावं- काही सांगता येत नाही) असलेली ही हॉबी कधी पॅशन झाली हेच कळलं नाही.
   प्रत्येक प्रकारचे लिखाण करुन मी ’हे ’ पण करु शकतो कां? हे चेक करणं सुरु झालं. . सारखं लॉग इन करणं, कॉमेंट्स आहेत का हे चेक करणं, असं सुरु झालं.
   बरेचदा वि षय नसायचा लिहायला.. पण काही तरी सुचावं म्हणु बेचैन वाटायचं.. हा एक चक्रव्युह आहे. ही लिहायची सवय लागली की ती सुटणे अवघड असते.

   पण या पोस्ट मुळे विचारांना चालना मिळाली.. माझा स्वभाव थोडा जिद्दी आहे. त्यामुळे कुठल्याही गोषटिच्या मागे हात धुवुन लागणे हा स्थायी भाव आहे. पण स्वतःवर कंट्रोल ठेवणं महत्वाचं.. हे ;लक्षात आलं..
   मनामधे इतके विचार आहेत, की कदाचित कॉमेंट असंध्द वाटेल, पण पोस्ट करतोय.

   अनिकेतने बरोबर म्हंटलं.. “बाकी गोडं शब्दात अंजन पडलं बरका डोळ्यात.”

   • प्रतीक्रियेकरता खूप आभार महेंद्र काका. पण अंजन वगैरे घालण्याचा उद्देश नव्हता हो खरच. लहान तोंडी मोठा घास घेतला गेला वाटते. मी अजून खूप लहान आहे आपल्यापेक्षा.
    असो, ब्लोगवर मनापासून स्वागत आहे.

 2. “बाकी गोडं शब्दात अंजन पडलं बरका डोळ्यात” तसा उद्देश नव्हता, बरंका अनिकेत दादा खरच.
  पण मनापासून वाटल म्हणून लिहील. खर सांगायचं तर हे सगळ मी स्वतःला सुद्धा सांगत असते जेव्हा blogging passion होण्याच्या वाटेवर जाऊ पाहते.
  असो, प्रतीक्रियेकरता खूप आभार. आपल्या नवीन post ची वाट पाहत आहे.

  • अगं असु देत गं, आम्ही काही वाईट अर्थाने नाही म्हणालो. खरंच तुझं पोस्ट छानच होतं आणि खऱ्या अर्थाने अंजन पडलं आहे. आणि हे ‘व्हर्चुअल जग’ आहे इथे कोणी लहान कोणी मोठं नसतं. आणि हे सिध्दच झालं आहे की जी गोष्ट आमच्या लक्षात नाही आली ति तु तुझ्या सोप्या पोस्टमधुन जाणिव करुन दिलीस

   महेंद्र म्हणाले, माझं ही तस्संच झालं होतं, उगाच लॉगीन करुन कमेंट्स बघायच्या, सतत नविन पोस्ट बद्दलच विचार करायचा, स्वतःसाठी लिहीणं म्हणुन चालु केलेला ब्लॉग हळु हळु इतरांसाठी, इतरांना आवडेल असं लिहीण्याचा कधी होत गेला ते कळालच नाही.

   असो, खरंच धन्यवाद ह्या पोस्ट बद्दल

 3. खुपच छान अन मनाला कुठेतरी जाणवणारी गोष्ट लिहिलियंस ताई… शेवटी ब्लॉगिंगचे व्यसन कधीच लागू नये, या गोष्टीशी मी पुर्णपणे सहमत आहे… ब्लॉगिंगची ही दुनिया व्हर्च्युअल जरी असली, तरी पण इथे भावना जुळल्या जातात, मग त्या अनोळख्यांच्या सोबत जरी असल्या तरी त्याची संगत कोणालाही सोडावी वाटत नाही (जसं की अनिकेत दादाच्या बाबतीत घडलं…)!

  विशल्या!

  • खरंय तुझं विशाल, मलाही पटत. खर तर ब्लोग्गिंग हा संवाद साधण्याचाच एक नवीन मार्ग आहे. माझी आई नेहमी हेच म्हणत असते आम्हाला, कि तुम्ही लोक प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा ब्लोग वरच जास्त बोलता. असो, प्रतीक्रियेकरता खूप आभार आणि ब्लोगवर स्वागत आहे.

 4. मस्त लिहीलेयेस गं …आम्हा सगळ्यांची व्यथा मोजक्या आणि परिणामकारक शब्दात मांडलीस….अभिनंदन तुझे….येव्हढे पर्फेक्ट अनॅलिसीस मला नसते मांडता आले..

  मी देखील हेच ठरवले होते की ब्लॉग डिलीट न करता, त्यावरचे हिट काउंटर काढून टाकायचे…कारण क्वालिटी की क्वांटिटी या वादात विजय क्वालिटीचाच व्हावा असे वाटते…
  तेव्हा तुझ्या या पोस्टबद्दल आभार…..

  • पण मी कितीही म्हटलं ना तरी ब्लोग वर comment आल्यावर मलाही छानच वाटत. असो, प्रतिक्रियेकरता खूप आभार आणि ब्लोगवर स्वागत आहे.

 5. आज रविंद्रजींच्या ब्लॉगावरून इथे आले..आणि उशीरा का होईना ही प्रतिक्रिया देतेय…त्यांना जे सांगितलं तेच कारण तुलाही देतेय….सध्या एक एक ब्लॉग घाऊकमध्ये वाचते…काय करणार…टेरिबल टु म्हणजे काय माहित आहे ना?? त्यातून जायचं तर लॅपटॉपची संगत कमी…
  असो…प्रथम नववर्षाच्या शुभेच्छा…अगं तू इतकं छान लिहिलंस ना??? अचानक सगळ्या चांगल्या ब्लॉगर्सनी अलविदा, कमी लिहिणार असं सगळं बोलायला सुरूवात केली तेव्हा त्यांच्यासाठी काही लिहावं याचा विचारच करत होते पण तू ते काम अगदी व्यवस्थित केलंस…तुझा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचला असेल अशी आशा….

 6. पिंगबॅक काय वाटेल ते- पहिला वाढ दिवस….. « काय वाटेल ते……..

 7. पिंगबॅक काय वाटेल ते- पहिला वाढ दिवस….. « काय वाटेल ते……..

 8. पिंगबॅक होते असे कधी कधी… « माझ्या मना …

 9. असा होत..
  एखादा धागा आपण बरोबर शब्दात पकडू शकतो
  खर तर प्रत्येक नवीन ब्लोग तयार करणाऱ्याच्या अशाच घडामोडी असतात.
  ब्लोग लिहिणे
  मग त्यावर कॉम्मेंत आली आहे का चेच्क करणे.
  कोण कोण बघून गेले.. किती जणांनी बघितला….
  मग stats किती नि काय काय… असा सुरुवातीला सगळ्यांचेच होते
  कुतूहल म्हणा किवा व्यसन म्हणा…
  पण आपण लिहिताना वाहवत जावून लिहिले नाही… तर त्यातील तरलता टिकून राहते…
  मी हि सध्या संयम राखून आहे.. जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा इतरांचे ब्लोग वाचतो…
  तेवढेच अनेक विचार कळतात… प्रत्येकाची शैली कळते…
  आणि ब्लोग चे तू अनेक फायदे सांगितलेस तसे… एक अजून आहे कि कविता किवा लेखाचे
  पुस्तक तयार करायचे म्हटले तरी काही हजार रुपये लागतात… त्यात प्रकाशक भेटत नाही
  भेटलाच तर वितरणाचा मुद्दा उपस्थित होतोच.. तेव्हा ब्लॉगरुपी एक पुस्तकच आपण लिहित असतो
  वाचणारे वाचतात.. थांबणारे थांबतात… त्यावर मत मांडतात… प्रोत्साहन देतात….
  तू छान विस्तृत माहिती दिलीस…
  अंजन virtually डोळ्यात गेला ग प्रत्येकाच्या.. आणि ते चांगल्या कारणासाठी असेल तर चांगलाच आहे …

  • उशीरा दिलेल्या reply बद्दल sorry बरंका पण मला वेळच मिळत नव्हता. कॉलेजच फेस्टिवल चालू होत नं. मी participate केल नसलं तरी excitement तर असतेच हो कि नाही? 🙂 त्यावर पण एक post लिहितेय. आणि हो खरय तुमच ब्लॉग्स लिहून आपली लिहिण्याची इच्छा पण पुर्ण होते. प्रतिक्रियेकरता मनापासून आभार 🙂

 10. पिंगबॅक माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस « थोडेसे मनातले …

 11. पिंगबॅक काय वाटेल ते- पहिला वाढ दिवस….. | काय वाटेल ते……..

 12. मी काही बाबतीत सहमत आहे…
  पण ब्लॉग हा फक्त मनातले विचार मांडणे एवढ्याच हेतूने लिहिले जातात असे नाही.
  ब्लॉगर मंडळीत काही जण फार सुंदर लिहितात आणि पुढे ते लेखनक्षेत्रात अधिक यशस्वी ही होतील तेव्हा वारंवार लिहीणे म्हणजे व्यसन आहे असे नाही.
  पण इतरांसाठी लिहीणे हे योग्य नाही. आपल्याला सुचेल ते लिहावे बाकी वाचक ठरवतील.

 13. ब्लॉग लिहिण्याला माझा विरोध नाही. तुम्ही म्हणता तसे आहेच कि , ब्लॉग हे खरतर फार चांगले व्यासपीठ आहे आपले विचार मांडण्याचे आणि आपली प्रतिभा मांडण्याचे देखील. फक्त ते व्यसन म्हणून घेऊ नये इतकेच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s