मुखपृष्ठ » mine » मुलगी असले .. म्हणून काय झाले?

मुलगी असले .. म्हणून काय झाले?

आज खूप दिवसांनंतर पोस्ट लिहिते आहे. कसं आहे ना कि मध्ये मला वेळच मिळत नव्हता. पण आज असा विषय सापडला आहे ना कि लिहावेच लागले.

पण सगळ्यात आधी, मी काही हल्ली जे काही महिला आरक्षणाबद्दल वाद चालले आहेत त्याबद्दल पोस्त लिहीत नाहीय. खरतर त्याहीपेक्षा माझ्या आयुष्यात जे घडते आहे ते मला महत्वाचे वाटते म्हणून त्याबद्दल मी  बोलणार आहे. हा विषय आहे आमच्या शिक्षणाबद्दल.

मला एक सांगा मुलीनी शिकायचे नसते का? आणि तसे असेल तर का? असे म्हणण्याचे कारण असे कि जेव्हापासून post graduation ला आले आहे तेव्हापासून बऱ्याच जणांचे टोमणे ऐकले आहेत. (मी M.Sc. ( Chemistry) च्या पहिल्या वर्षाला आहे.)आणि तेसुद्धा चांगल्या शिकलेल्या लोकांकडून.

म्हणजे त्याचे असे झाले कि आत्ताच काही दिवसांपूर्वी आमचे super senior म्हणजे Ph.D. चे student आमचे सर आम्हाला काही reaction mechanisms समजावून सांगत होते. नंतर ते म्हणाले कि हे exam मध्ये नही पण interview ला विचारतात. अर्थात तुम्ही गेलात तर.  आणि नंतर सगळ्या मुलींकडे खुण करून म्हणाले कि या तर कोणी जाणारच नाहीत. मग आम्ही म्हटले कि का आम्ही का नाही जाणार, तर म्हणाले कि तुम्ही काही करणार नही. त्यांनी विचारले कि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांपैकी (मुले-मुली दोन्हीही )कोण कोण जोब करणार त्यांनी हात वर करा तर सगळ्या मुलीनी लगेच हात वरती केला आणि मुलांपैकी मोजून तीन चार मुलांनीच हात वर केला तर सर् म्हणाले ज्यांना हात वर करायला सांगितला त्यांनी केला नाही आणि दुसर्यानीच केला. येथे हे महत्वाचे आहे कि आमच्या वर्गात मुलींची संख्या जास्त आहे. 90 पैकी निम्म्यापेक्षा जास्त मुली आहेत.

तसेच एक आमच्या कॉलेजचा pass out student आला होता. त्याला सरांनी आम्हाला मार्गदर्शन करायला सांगितले तर त्याने किती ऐकवले. म्हणे मुली का शिकतात. उगीच मुलांची जागा अडवून ठेवतात. पुढे काही करत नाहीत. आणखी एका senior ने सुद्धा आम्हाला असेच ऐकवले. म्हणे आमच्या वर्गातल्या किती मुलींची लग्न झाली आहे. का शिकता तुम्ही?

आता मला सांगा आम्ही मुलांची जागा अडवून ठेवतो म्हणजे काय? आम्हाला काही आरक्षण नसते येथे. merit नुसार admission होते. मग मुलांचा number न लागता आमचा लागतो त्याला आम्ही काय करायचे ? आई वडील मुलींची लग्न लवकर करतात त्यात मुलींचा काय दोष? म्हणून काय आम्ही शिक्षण घ्यायचे नाही का ? तुम्हाला काय वाटते?

Advertisements

26 thoughts on “मुलगी असले .. म्हणून काय झाले?

  • हो खरच. म्हणूनच तर आम्ही कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता शिकतो आहोत. पण सगळ्यांना हा मुद्दा कळवा म्हणून हा लेख लिहावासा वाटला. असो प्रतिक्रियेकरता धन्यवाद. लोभ असावा. ब्लोगवर स्वागत आहे.

 1. Chyaaila atich hotay he…. kalach mazi ek maitrin sangat hoti tila hi koni tari mhanale ” CA kashalaa karatyes eka attempt madhye pass nahi zalis tar lagnache kaay???? tyapeksha dusare kahitari kar, chanashi nokari milav lagna chya drushtine hi changale” Arre kaay????…… Mulini career karayache te pan kaay LAGN ha mudda dolya samor thevun… Goal,desire,aim,achivement hya goshtina mulinchye life madhye kahich arth nai kaa??????
  Ajunahi he asale vichar aikun tidik jaate dokyat…

  • मला देखील हेच म्हणायच आहे. मुलीचं शिक्षण हे काय फक्त लग्नासाठी चांगला मुलगा मिळावा म्हणून? बाकी त्यांच्या काहीच इच्छा आकांक्षा नसतात का? असो. प्रतिक्रियेकरता खूप आभार. ब्लोगवर स्वागत आहे.

 2. तुमचं म्हणन अगदी बरोबर आहे. त्या अकलेच्या कांद्यांच काही मनावर घेऊ नका. आणि शिक्षणात मुली पुढे आहेत. हे त्यांना पटत नसेल म्हणून असे म्हणत असतील. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बाकी, तुमची नोंद छान झाली आहे. सत्य आहे.

 3. jivanika, उगाच कोणाच्याही बोलण्याकडे कशाला लक्ष द्यायचे आणि शिक्षण तर घ्यायलाच हवे ना…अगदी नोकरी करायची या उद्देशाने घेतले तरीही चालेल. नोकरी आपण आपल्यासाठीच करणार ना… फक्त चांगला नवरा मिळावा म्हणून शिकायचे म्हणजे… स्वत:साठीच काहीच न करण्यासारखे झाले. अनेक शुभेच्छा व पाठिंबाही.

  • खरच मनापासून आभार. मी देखील य बोलाण्यांकडे दुर्लक्षच करते पण सतत हेच बोलणे ऐकत राहावे लागते म्हणून म्हटले सगळ्यांशी share करावे. प्रतिक्रियेकरता खूप आभार.

 4. मला वाटत ज्या लोकांनी असले टोमणे मारलेत त्या लोकांचे विचार मागासलेले आहेत. आजच्या युगात मुली सर्वच क्षेत्रात पुढेच आहेत. कितीही ignore केल तरीही हि गोष्ट त्यांना मान्य करावीच लागेल. मला तुमच्या blog वरून थोड frustration दिसून येतंय. तेव्हा मला तुम्हाला हेच सांगावस वाटतंय कि तुम्ही त्यांना ignore करा . आपल्याला आयुष्यात जे achieve करायचं आहे ते आपण करून दाखवणारच .शिक्षण हे काही फक्त चांगला नवरा मिळावा किंवा चांगली नोकरी मिळावी म्हणून नसते तर ते आपल्याला self sufficient बनवते. So all the best…….

  • अग बाई मला तू म्हण ग !!! खूप मोठ झाल्यासारख (वयाने) वाटत. असो, प्रतिक्रीयेकारता खूप आभार आणि frustration बद्दल म्हणशील तर तस काही नाही. आता अशा बोलण्याची सवय झाली आहे. त्यामुळे फार मनावर घेत नाही. ब्लोगवर स्वागत आहे.

 5. माझ्या ब्लॉगवरील प्रतिक्रियांसाठी आभार…
  माझ्या नोंदी बर्‍यापैकी जून्या असल्यामुळे इथे प्रतिक्रिया देऊन आभार मानले…
  तुमच्या काही नोंदी वाचल्या. छान लिहीता तुम्ही. पण लेखनाचा सूर थोडासा नकारात्मक वाटला. मनामध्ये बर्‍याच गोष्टींबद्दल खंत किंवा खेद आहे असं जाणवतं. असो.
  अनुभवावरून सांगतो, दुनियेचं बोलणं आपल्याला पटलं तरच ऐकायचं न पटलं तर सरळ दुर्लक्ष करायचं.

  जे लेखन मनापासून केलं जातं ते मनापर्यंत जाऊन भिडतं. म्हणून… लिहीत राहा…

  • आभार. तुमचा ब्लॉग खरच छान आहे. माझ्या लेखनाबद्दल म्हणाल तर नकारात्मक नाही पण हो कधी कधी लोकांच बोलण लागत मनाला. असो. प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लोगवर स्वागत आहे.

 6. jivanika, लोंकच्या बोलण्यवर तुम्ही लक्ष न दिलेले बरे. शिक्षणावर सग्ळ्यांच अधिकार आहे.

  लोकांची मानसिकता बदलायला थोडा वेळ लागेल अजुन…

  • खरे आहे तुमचे. म्हणूनच मी जास्त लक्ष देत नाही तिकडे. आपले काम आपण चालु ठेवायचे. प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लोगवर स्वागत आहे.

 7. जीवनिका,

  शिक्षण ही एक ऐच्छिक गोष्ट आहे. मुलींमुळे मुलांच्या जागा अडल्या हे म्हणनच मुळात हास्यास्पद आहे आणि कोत्या मनोवृतीची झलक आहे.
  मी तर एकाच सांगेन की ह्या सर्वांकडे दुर्लक्ष करून पुढे जायचे आणि नवीन क्षितिजे शोधायची..

  खूप शुभेच्छा,
  भारत मुंबईकर

 8. माझ्या ब्लोगवरील प्रतिक्रियेबद्दल आभार…
  तू छान लिहितेस. (एकेरीत सुरुवात केली कारण आंतरजालावर लहान मोठ्ठे कोणी नसते!) तू म्हणालीस, “चांगल्या शिकलेल्या लोकांकडूनही टोमणे येतात”… सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्ये हाच तर फरक असतो न…
  हे देखील बदलत जाईल… अशा मानसिकतेचे बाळकडू लहानपणी पासून सुप्त रित्या दिलेले असतात. आत्ताच्या पिढीने त्यांच्या मुला-मुलींना वाढवताना कुठलाही सुक्ष्म भेदभाव केला नाही तर अशा वृत्ती नक्कीच कमी होतील.

  • तुमच म्हणण बरोबर आहे. खरच हा भेदभाव कमी झाला पाहिजे.
   प्रतिक्रियेसाठी खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत आहे.

 9. जीवनिका,
  अगदी खुल्लम खुल्ला बोलायचं तर आज काल सर्व जाती धर्मातील मुली ह्या शिकून शहाण्या,हुशार झाल्यामुळे मुलांची शब्दशः फाटलिये. शतकां नु शतके पुरुषप्रधान संस्कृती मुळे पुरुषांची मानसिकता स्त्रिया,मुलींबाबत कूपमंडूकच राहिली आहे हे अजून हि पुरुषजात मान्य करायला तयार नाही.”जिच्या हाती पाळण्याची दोरी..ती जग उद्धारी” च्या ऐवजी खरे तर स्लोगन बदलून ते “जिच्या हाती शिक्षणाची शिदोरी नि पाळण्याची दोरी … तीच केवळ जग उद्धारी” ह्या प्रमाणे केले पाहिजे.सेमने म्हटल्या प्रमाणे “आत्ताच्या पिढीने त्यांच्या मुला-मुलींना वाढवताना कुठलाही सुक्ष्म भेदभाव केला नाही तर अशा वृत्ती नक्कीच कमी होतील.” नव्हे ती काळाची गरज आहे असे माझेही मत आहे…..विशेष म्हणजे मला मुलगी नसताना.. 🙂
  ह्या सुंदर,सरळ नि अतिशय प्रामाणिक लेखा बद्दल…नव्हे मनोगता बद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. तुझ्या भावना आमच्या पर्यंत नक्की पोहोचल्या आहेत..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s