मुखपृष्ठ » घटना » मी सिंधुताई सपकाळ

मी सिंधुताई सपकाळ

सगळ्यात आधी, मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही म्हणून हा movie review नाही. पूर्वी एका मराठी वाहिनीवर बिन भिंतीच घर म्हणून कार्यक्रम यायचा. त्यात एकदा सिंधुताई सपकाळ यांना बोलावलं गेल होत. खर तर त्या आधी मी कधी त्यांच्या  बद्दल काहीही ऐकल नव्हत. त्या कार्यक्रमात त्यांना पहिल्यांदा पाहिलं. पण तरीही त्यांच बोलणं ऐकून इतक छान वाटलं. मला त्यांच्या बद्दल अजूनही फारस काही माहिती नाही. त्या किती शिकलेल्या आहेत वगैरे पण त्याचं बोलण खरच इतक प्रभावी होत कि एखाद्या सुशीक्षितालाही लाजवेल. शिवाय त्यांचा कर्तुत्व सुद्धा तसचं आहे. त्यात त्यांनी एक उदाहरण सांगितलं. मला नाही माहित कि ते किती लोकांना पटेल किंवा काय ते पण मला ते इथे सांगावस वाटतंय. त्यांनी मुलगा आणि मुलगी यातला स्वभावातला फरक नेमक्या शब्दात सांगितला होता.  तो मी जमेल तसा माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते. समजा एखाद्या अगदी गरीब घरी अचानक पाहुणे आले. घराची अवस्था अगदीच इतकी कि घरी दुध देखील नाही पाहुण्यांना चहा करायला. अशा वेळेला जेव्हा आई मुलाला गुपचूप आतल्या खोलीत नेऊन गुपचूप सांगते कि बाळ हे पैसे घे आणि ग्लासात दुध घेऊन ये. मुलगा काय करतो, कि एका हातात ग्लास आणि एका हातात पैसे नाचवत हुण्यांच्या कडे बघत बघत बाहेर जाईल. पण हेच जर आईने मुलीला सांगितले तर ती मुलगी पैसे आणि ग्लास आपल्या फाटक्या फ्रॉक मध्ये लपवत खाली मान घालून हलून पाहुण्यांच्या समोरून जाईल. खूप साध उदाहरण आहे पण मतितार्थ खूप मोठा. कदाचित कोणी सहमत नसेलही पण स्वभावातला मूळ फरक त्यांनी अगदी नेमक्या शब्दात मांडला आहे. मला त्यांच्या बाकी गोष्टी तितक्या लक्षात राहिल्या नाहीत पण हे उदाहरण मात्र लक्षात राहीलं. (कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता पण तरी दुखावल्या गेल्या असतील तर sorry.)

Advertisements

17 thoughts on “मी सिंधुताई सपकाळ

 1. ताईंनी दिलेलं उदाहरण छान आहे. त्यांचा अनुभव यातून दिसून येतो. ताईंबद्दल खूप ऐकलं आहे पण प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही. मध्यंतरी त्यांचं मनोगत असलेलं एक ईमेल आलं होतं मला. त्यातही त्यांनी लिहिलेला शब्द न्‌ शब्द मला पटला होता. आपल्याकडे अशा व्यक्तींवर चित्रपट निघाल्याशिवाय त्यांची चर्चा होत नाही.

 2. मी बरेच दिवस ताईंच्या चित्रपटाबद्दल ऐकुन आहे. यापुर्वी ताईंची मला माहिती नव्हती. येथेच माहिती मिळाली. त्यांचा मला अभिमान व आदर वाटतो. -शेखर देसाई, आधार प्रतिष्ठान – रत्नागिरी.

 3. प्रतिक्रियेकरता खूप आभार आणि ब्लोगवर स्वागत आहे. खूप उशिरा reply करते आहे त्याबद्दल sorry. खूप दिवसांत आले नव्हते ब्लोग वर म्हणून राहिलेच.

 4. सिंधू ताईने जे सोसले आहे; ते कुणाच्या वाट्याला येऊ नये, कारण प्रत्येकाची सहनशक्ती सारखी नसते. त्यांच्या मध्ये असणाऱ्या आईला माझा साक्षांत नमस्कार .

 5. हा ब्लॉग इतक्या उशिराने वाचतेय आणि उशिरा comment करतेय त्याबद्दल Sorry

  मी पिक्चरपूर्वी त्यांची मुलाखत पाहीली ‘खुपते तिथे गुप्ते’ मधली

  मी त्यांना पहिल्यांदा पाहत होते पण खरंच सांगते मी त्यांची Fan झाले

  आणि त्यांची Movie (तेजस्विनी पंडीतने खरंच चांगले काम केलेय) तर पाहण्यासारखीच आहे पण त्याहूनही त्यांना बोलताना ऐकणं ही कधीच miss करू नये अशी पर्वणी आहे.

  Part 1: http://www.youtube.com/watch?v=MorsReqkzfs

  Part 2: http://www.youtube.com/watch?v=hyGYmDhAPr8

  Part 3: http://www.youtube.com/watch?v=wpBvthZYQS8

  Part 4: http://www.youtube.com/watch?v=rlHK15tMqgM

 6. मलाही त्यांची मुलाखत पाहायची होती. links बद्दल आभार.
  प्रतिक्रियेकरता खूप आभार आणि ब्लोगवर स्वागत आहे.

 7. MAI

  SINDHUTAI TAI SAKPAL PAN MAZI MAI MALA TYA MAICHYA RUPATACH NEHMI AVDTAT KARAN MI NEHMICH TYANA MANONI APLYA VASTE ANI TYANA APLI GURU MANTE MAI MALA THUMHALA BHETUN KHUP KAHI SHIKAYCHA AAHE PAN TI SANDHI KADI YEAIL MAHIT NAHI TARI PAN LOVKARACH YEAIL KARAN GURU SUDHA APLYA SHISHALA BHETLYA SHIVAI JASTA DIVAS RAHU SHAKAT NAHI

  TUMCHICH SHISYA,
  PRATIDNYA PATIL.

 8. MAI

  SINDHUTAI SAKPAL PAN MAZI MAI MALA TYA MAICHYA RUPATACH NEHMI AVDTAT KARAN MI NEHMICH TYANA APLYA MANONI VASTE ANI TYANA APLI GURU MANTE MAI MALA THUMHALA BHETUN KHUP KAHI SHIKAYCHA AAHE PAN TI SANDHI KADI YEAIL MAHIT NAHI TARI PAN LOVKARACH YEAIL KARAN GURU SUDHA APLYA SHISHALA BHETLYA SHIVAI JASTA DIVAS RAHU SHAKAT NAHI

  TUMCHICH SHISYA,
  PRATIDNYA PATIL.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s