edx

edx म्हणजे नेमक काय हे जाणून घेण्याआधी मी म्हणेन कि एकदा आपल्या स्वप्नांच्या गल्लीत फेरफटका मारून या.  तिथे काही पूर्ण झालेली स्वप्न, काही अपूर्ण राहिलेली, या ना त्या कारणाने पूर्ण न होऊ शकलेली अशी बरीच स्वप्न पहुडलेली दिसतील.

आपल्यापैकी किती महत्त्वाकांक्षी लोकांनी असच एक स्वप्न पाहिलं असेल. एखाद्या नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून शिक्षण घेण्याच स्वप्न. कितींनी तरुण वयात आणि काहींनी उतारवयात देखील हे स्वप्न पाहिलं असेल. पण अशी सर्वसामन्यांच्या खिशाला न परवडणारी स्वप्न मनाच्या कोपऱ्यात पडून राहतात आणि नंतर काळाच्या ओघात विरून जातात. पण तुमचं हे लाखमोलाचं स्वप्न घरबसल्या पूर्ण होऊ शकतं असं सांगितलं तर.

MIT, Harvard, Texas, IIT या आणि यासारख्या बऱ्याच नामांकित विद्यापीठांनी आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन Edx नावाने एक ऑनलाईन पोर्टल सुरु केल आहे ज्यात जगभरातल्या अनेक विद्यापीठांकडून मान्यताप्राप्त कोर्स घेता येऊन शकतात आणि तेही घर बसल्या. त्यासाठी फक्त गरज आहे संगणकाची, इंटरनेटची आणि अर्थातच तुमच्या वेळेची आणि इच्छाशक्तीची.

काहीच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या आणि मोजक्याच विद्यापीठांचा समावेश असणऱ्या या उपक्रमाचा आवाका पाहता पाहता वाढला आणि आज जगभरातील जवळ जवळ ४० शिक्षण संस्थांकडून मान्यता असणारे ३०० हून अधिक कोर्स इथे उपलब्ध आहेत. Architecture, electronics, computer, science, arts and culture, economics and finance, history, law एवढंच नव्हे तर ancient language, music, medicine आणि अशा अनेक विषयांशी संबंधित कोर्स येथे उपलब्ध आहेत. या कॉर्सेसची आणखी एक खासियत म्हणजे शिकवण्यासाठी असणारा शिक्षकवृंद ही याच नामांकित संस्थां मधला आहे.

https://www.edx.org/

या साईटवर विनामुल्य नोंदणी करून खाते तयार करा. आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या कोर्स मधे नाव नोंदवा. कोणत्या कोर्स बद्दल कोणते बेसिक ज्ञान असणे अपेक्षित आहे, कोर्स कधी सुरु होणार आहे, किती कालावधीचा आहे याची सर्व माहिती तिथे उपलब्ध असते. निव्वळ ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने हा कोर्स करता येतो किंवा प्रमाणपत्र मिळावे यासाठीही मागणी करता येते, मात्र त्याकरता आवश्यक तीरक्कम मोजावी लागते. यात तुम्ही सोडवलेले प्रश्न आणि शेवटी घेतली जाणारी चाचणी यांच्या आधारावर मूल्यमापन होते.  आणि योग्य गुण मिळाले असल्यास प्रमाणपत्र मिळते.

तर तुम्हाला आवड असणाऱ्या विविध विषयांसंबंधी ज्ञान मिळविण देणारे हे भांडार तुमच्यासाठी खुलं आहे. याचा लाभ नक्की घ्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s