युगा


आयुष्यात पहिल्या पानावरून शेवटच्या पानापर्यंतचा प्रवास केल्यानंतर जेव्हा आपण पुन्हा पहिलं पान उघडतो तेव्हा विश्वास ठेवण कठीण जात कि आपणच हे आयुष्य जगलोय. असच काहीसा आयुष्य जगलेली युगा … युगंधरा

डॉ सुमती क्षेत्रमाडे यांची युगंधरा मनात घर करून राहते. अनेक प्रश्न मनात निर्माण करते. खरच का नियती इतकी निष्ठुर असते ? खरच का ती आपल्याशी खेळण्यासारखी खेळते ? एक न दोन अनेक प्रश्न…

अशा वेळी खरच पटत कि आपण नियतीच्या हातच बाहूल आहोत.  नियती आपल्याला हव तस खेळवू शकते.

ही कादंबरी स्त्रीच्या मनाचे वेगवेगळे पैलू उलगडत जाते. तिचा हळवेपणा आणि प्रसंगी गंभीरपणा. युगाचा त्याग मनात घर करून राहतो. जन्मदात्या आईने दिलेली दुषणे, भावांचा निष्काळजीपणा आणि वडिलांचा शांत धीरगंभीर स्वभाव यांना सहन करता करता सोबतच कर्तव्यासाठी प्रेमाचा त्याग. शांत स्वभाव कसा सहन करावा लागतो असा प्रश्न पडेल कदाचित पण मला वाटत कधी कधी जवळच्या माणसाची अफाट सहन शक्ती आपल्याला मनातून कुरतडते.

तर अशी ही युगा. पण इथे फक्त तिच्या स्वभावाच दर्शन घडत नाही. इथे जुनाच स्त्री पुरुष फरक पुन्हा दिसतो, जाणवतो. शिक्षणाची मनीषा, हुशारी असूनही तिला घरच्या जबाबदारीकडे पाठ फिरवता येत नाही.

या कादंबरीतील काही उपमा, वाक्य खूप छान आहेत.

मला खूप आवडलेलं, ‘ व्यवहाराशी विसंगत तत्त्व हे उंबराच्या फुलासारख असत. तत्त्वाच रंग रूप बघितलय कुणी? व्यवहारात त्याचा काय उपयोग?आणि हे उंबराच फुल रंगरुपासह खाली उतरलं तर ते खाऊन पोट भरेल?  ‘

‘एकमेंकाशी कुणी बोललं नाही , संघर्ष नकोत, मतभेद नकोत म्हणून बोलचाल टाळण्यासाठी भेट – नव्हे दृष्टी भेटही टाळली तरी त्यामुळे निर्माण होणारी शांतता खरी शांतता असते? अशा मूक माणसांचे श्वासही एकमेकांच्या मनात दाहकता निर्माण करतात. मनः स्वास्थ्य बिघडवतात.’

‘ वेदनेच सामर्थ्य कमी झाल कि त्याच रुपांतर दुःखात होत.’

‘सुख अस मिळत नाही, ते मिळवाव लागत.’ ‘ ज्याला स्वतःच सुख मिळवता येत नाही तो दुर्बल का?’

त्या निमित्ताने सुचलेली कविता, कविता कसली शब्दाला शब्द जोडून केलेली रचना.

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

येणाऱ्या प्रत्येक जीवाला

हातच्या खेळण्या सारख खेळवते

सर्व दोर हाती धरून

कठपुतली सारख नाचवते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

चेहऱ्यावरच हसू

किती कठोरतेने पुसते

डोळ्यातलं पाणी पाहून

निर्दयतेने हसते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

गेल्याजन्मीच्या पाप पुण्याचे हिशेब

या जन्मी मांडते

आणि खरोखरीच निष्पाप जीवांवर

जीवघेणे आघात करते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

दोन क्षणात

होत्याच नव्हत करते

पाहता पाहता

उभ्या जीवनच मातेर करते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

पण हळूच कधी कधी

ओंजळी भर भरून सुख देते

दुखालेल्या जीवाला

मायेची उब देते

खरच ही नियती इतकी का निष्टुर असते ?

Advertisements

मुलगी असले .. म्हणून काय झाले?


आज खूप दिवसांनंतर पोस्ट लिहिते आहे. कसं आहे ना कि मध्ये मला वेळच मिळत नव्हता. पण आज असा विषय सापडला आहे ना कि लिहावेच लागले.

पण सगळ्यात आधी, मी काही हल्ली जे काही महिला आरक्षणाबद्दल वाद चालले आहेत त्याबद्दल पोस्त लिहीत नाहीय. खरतर त्याहीपेक्षा माझ्या आयुष्यात जे घडते आहे ते मला महत्वाचे वाटते म्हणून त्याबद्दल मी  बोलणार आहे. हा विषय आहे आमच्या शिक्षणाबद्दल.

मला एक सांगा मुलीनी शिकायचे नसते का? आणि तसे असेल तर का? असे म्हणण्याचे कारण असे कि जेव्हापासून post graduation ला आले आहे तेव्हापासून बऱ्याच जणांचे टोमणे ऐकले आहेत. (मी M.Sc. ( Chemistry) च्या पहिल्या वर्षाला आहे.)आणि तेसुद्धा चांगल्या शिकलेल्या लोकांकडून.

म्हणजे त्याचे असे झाले कि आत्ताच काही दिवसांपूर्वी आमचे super senior म्हणजे Ph.D. चे student आमचे सर आम्हाला काही reaction mechanisms समजावून सांगत होते. नंतर ते म्हणाले कि हे exam मध्ये नही पण interview ला विचारतात. अर्थात तुम्ही गेलात तर.  आणि नंतर सगळ्या मुलींकडे खुण करून म्हणाले कि या तर कोणी जाणारच नाहीत. मग आम्ही म्हटले कि का आम्ही का नाही जाणार, तर म्हणाले कि तुम्ही काही करणार नही. त्यांनी विचारले कि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांपैकी (मुले-मुली दोन्हीही )कोण कोण जोब करणार त्यांनी हात वर करा तर सगळ्या मुलीनी लगेच हात वरती केला आणि मुलांपैकी मोजून तीन चार मुलांनीच हात वर केला तर सर् म्हणाले ज्यांना हात वर करायला सांगितला त्यांनी केला नाही आणि दुसर्यानीच केला. येथे हे महत्वाचे आहे कि आमच्या वर्गात मुलींची संख्या जास्त आहे. 90 पैकी निम्म्यापेक्षा जास्त मुली आहेत.

तसेच एक आमच्या कॉलेजचा pass out student आला होता. त्याला सरांनी आम्हाला मार्गदर्शन करायला सांगितले तर त्याने किती ऐकवले. म्हणे मुली का शिकतात. उगीच मुलांची जागा अडवून ठेवतात. पुढे काही करत नाहीत. आणखी एका senior ने सुद्धा आम्हाला असेच ऐकवले. म्हणे आमच्या वर्गातल्या किती मुलींची लग्न झाली आहे. का शिकता तुम्ही?

आता मला सांगा आम्ही मुलांची जागा अडवून ठेवतो म्हणजे काय? आम्हाला काही आरक्षण नसते येथे. merit नुसार admission होते. मग मुलांचा number न लागता आमचा लागतो त्याला आम्ही काय करायचे ? आई वडील मुलींची लग्न लवकर करतात त्यात मुलींचा काय दोष? म्हणून काय आम्ही शिक्षण घ्यायचे नाही का ? तुम्हाला काय वाटते?