मी सिंधुताई सपकाळ


सगळ्यात आधी, मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही म्हणून हा movie review नाही. पूर्वी एका मराठी वाहिनीवर बिन भिंतीच घर म्हणून कार्यक्रम यायचा. त्यात एकदा सिंधुताई सपकाळ यांना बोलावलं गेल होत. खर तर त्या आधी मी कधी त्यांच्या  बद्दल काहीही ऐकल नव्हत. त्या कार्यक्रमात त्यांना पहिल्यांदा पाहिलं. पण तरीही त्यांच बोलणं ऐकून इतक छान वाटलं. मला त्यांच्या बद्दल अजूनही फारस काही माहिती नाही. त्या किती शिकलेल्या आहेत वगैरे पण त्याचं बोलण खरच इतक प्रभावी होत कि एखाद्या सुशीक्षितालाही लाजवेल. शिवाय त्यांचा कर्तुत्व सुद्धा तसचं आहे. त्यात त्यांनी एक उदाहरण सांगितलं. मला नाही माहित कि ते किती लोकांना पटेल किंवा काय ते पण मला ते इथे सांगावस वाटतंय. त्यांनी मुलगा आणि मुलगी यातला स्वभावातला फरक नेमक्या शब्दात सांगितला होता.  तो मी जमेल तसा माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते. समजा एखाद्या अगदी गरीब घरी अचानक पाहुणे आले. घराची अवस्था अगदीच इतकी कि घरी दुध देखील नाही पाहुण्यांना चहा करायला. अशा वेळेला जेव्हा आई मुलाला गुपचूप आतल्या खोलीत नेऊन गुपचूप सांगते कि बाळ हे पैसे घे आणि ग्लासात दुध घेऊन ये. मुलगा काय करतो, कि एका हातात ग्लास आणि एका हातात पैसे नाचवत हुण्यांच्या कडे बघत बघत बाहेर जाईल. पण हेच जर आईने मुलीला सांगितले तर ती मुलगी पैसे आणि ग्लास आपल्या फाटक्या फ्रॉक मध्ये लपवत खाली मान घालून हलून पाहुण्यांच्या समोरून जाईल. खूप साध उदाहरण आहे पण मतितार्थ खूप मोठा. कदाचित कोणी सहमत नसेलही पण स्वभावातला मूळ फरक त्यांनी अगदी नेमक्या शब्दात मांडला आहे. मला त्यांच्या बाकी गोष्टी तितक्या लक्षात राहिल्या नाहीत पण हे उदाहरण मात्र लक्षात राहीलं. (कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता पण तरी दुखावल्या गेल्या असतील तर sorry.)

Advertisements