डोंबारयाचा खेळ


आजच एक डोंबारयाचा खेळ पहिला आणि सहज विचार करता करता फार पूर्वी ऐकलेली एक कथा आठवली. प्रत्येकाने नेहमी आठवावी अशी आहे. म्हणून इथे लिहावीशी वाटली.
देवाने मलाच का दुख दिलं, इतर कसे सुखी आहेत असा प्रश्न प्रत्येकालाच कधी न कधी पडतो. अशाच सततच्या प्रश्नांना कंटाळलेल्या देवाने एकदा माणसांना एक सवलत देऊ केली. त्याने सांगितले कि प्रत्येकाला आपापले दुख इतरांच्या दुखासोबत बदलून घेता येईल पण त्यानंतर मात्र आयुष्यभर त्याला त्या नव्या दुखासोबत जगावे लागेल.  आपल्या वाटेला आलेल्या त्रासाला कंटाळलेल्या लोकांनी ते मान्य केले.

मग देवाने त्यांना सांगितले कि प्रत्येकाने आपले दुख नीट बांधून आणायचे आणि एका मोठ्या झाडाखाली ठेवायचे. नंतर आपले सोडून इतरांच्या दुखापैकी कोणतेही उचलायचे. सगळ्यांनी तसेच केले. पण जेव्हा ते उघडून पहिल तेव्हा मात्र प्रत्येकाला मिळालेलं दुख पाहून भोवळच आली, वाटल आपल तेच बर होत.सगळ्यांनी देवाला विनंती केली कि आम्हाला आमचेच भोग भोगू दे, इतरांचे नको.

तात्पर्य – इतरांच जे दुख लांबून सौम्य वाटत ते प्रत्यक्षात किती दाहक असतं ते जवळ गेल्यावरच कळत.

पुणे


अजून पुण्यात येऊन काही महिनेच होत आहेत आणि खर सांगू पुण्यात असण्याचा आणि पुणेकर म्हणवण्याचा अभिमान वाटायला लागला आहे. का कुणास ठाऊक पण एक समाधान वाटत. पण अजूनही कधी कधी विचार करायला बसले न तर विश्वास बसत नाही कि मी खरच पुण्यात आहे. खरच गेल्या वर्षापर्यंत जे पुण माझ्यासाठी एक स्वप्ना सारख होत त्याच पुण्यात मी राहते यावर विश्वास ठेवण कठीण जात. फार पूर्वीपासून मला पुण्यात येण्याची इच्छा होती. अगदी बारावी नंतर यायचं होत पण शक्य झाल नाही नंतर graduation ची तीन वर्ष काढली नाशकात  आणि ठरवलं कि आता तरी पुण्यातच जायचं pg साठी.खर सांगते त्यावेळी university त शिकायला येण्याची खूप इच्छा होती. शिवाय मी पर्यायी पुण्यातल्या सगळ्या कॉलेजचे forms download करून ठेवले होते (त्यात माझ्या आताच्या कॉलेज चाही form होता.) . पुणे विद्यापीठात नंबर लागतहि होता पण काय करणार नशिबातच नव्हते. पण मी ठरवले आता नाही तर नाही पण दोन वर्षांनी phd करण्यासाठी तरी मी पुण्यातच जाणार काहीही झाले तरीही. पण नशीब बघा एक वर्ष आधीच मला इथे यायला मिळाल आणि तेही अक्षरश ढकलून ढकलून आणालय नशिबाने. पूर्वी माझा नशिबावर इतका विश्वास नव्हता पण गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी माझा खरच विश्वास बसला नशिबावर. घटना अगदी पूर्वी ठरवल्या सारख्या घडत गेल्या.

खर तर आमच्या साठी सोप नव्हत इतकी वर्ष एका शहरात राहिल्यावर तिथल सगळ सोडून एका अगदीच नव्या शहरात राहायला जाण. तेही सगळ बिर्हाड उचलून. आणि आम्ही कधी असा विचारही केला नव्हता कि आम्ही कधी अस करू. पण बाबांची बदली होण् (टाळूनही), माझ पुण्यात यायला तयार होण् आणि आम्ही येथे येण अगदी अशक्य वाटणार, पण ते झाल. मी तयार नव्हते कारण एक वर्ष तिकडे काढून मग इथे सगळ नव्याने करण मला कठीण वाटत होत. पण अस सगळ बदलत गेल कि आम्हाला इथे यावच लागल.

पण इथे येण्याआधी मला सगळ्यांनी घाबरवल होत कि तिथे जाते आहेस पण तुला जमणार आहे का, तिथले लोक म्हणजे पुणेकर लवकर accept करणार नाहीत, तू एकटी पडशील, friends मिळणार नाहीत, वगैरे वगैरे. मी पण जरा घाबरलेच होते पण मग ठरवले कि जाऊ देत. मी माझ काम करीन. कोणी नाही मिळाल सोबत तरी मी एकटी काढीन हे वर्ष कसही. पण नाही, खरच मी collg मध्ये गेल्यावर पहिल्याच दिवशी मला जाणवलं कि सगळे किती चुकीचे होते.  इथल्या लोकांनी मला इतक्या लवकर आणि आपुलकीने accept केल कि मला जाणीवच होऊ दिली नाही कि मी इथे नवीन आहे म्हणून. त्यात मला नशिबाने collg पण इतक चांगल मिळाल. खरच सगळ नशिबानेच होत.

आज जरा मागे जाऊन सगळ्या गोष्टींचा विचार केला कि कळत कि जे होत ते चांगल्यासाठीच होत. मला पुण्यात येऊन जे काही मिळाल आहे ना ते इतक अमुल्य आहे कि ते मी कधीही विसरू शकणार नाही. मला मीच सापडले, उमगले. मला जगण म्हणजे काय ते कळाल. मी आयुष्य जगायला खऱ्या अर्थाने इथे सुरुवात केली. माझी स्वतःची ओळख निर्माण झाली. मी सुद्धा काहीतरी आहे हे माझ मलाच कळल. स्वतः ला सिध्द करण्याची हिम्मत आली. आयुष्य जगण्याची दिशा मिळाली. म्हणून आज पुण्यात असण्याच समाधान वाटत.

उगीचच काहीतरी


आज खूप दिवसांनी खरतर महिन्यांनी मी ब्लोगवर लिहिते आहे. एरवी लिहीत होते पण ते ब्लोगवर उतरवायचा कंटाळा केला. शिवाय बऱ्याच पोस्ट तर तश्याच अर्धवट लिहिलेल्या पडून आहे. पूर्ण केल्याच नाहीत. त्यातले बरेच विषय आता जुनेदेखील झाले. हा लेख पण मी १३ डिसेंबर १० ला लिहिला आहे. पण आज येथे उतरवते आहे तसा चा तसा. लेख घटनेवर आहे म्हणून थोडा विस्कळीत वाटेल कदाचित .

कधी कधी मन फार अस्वस्थ होत. उगाच काहीतरी विचार करत बसत. सगळ्याच गोष्टींचा अर्थ कळेनासा होतो. कोणत्याच गोष्टीवर आपला म्हणावा तसा हक्क नाही अस वाटत. आणि मनाला काय अगदी साधी छोटी घटना देखील पुरते विचार करायला. अशीच घटना म्हणजे – काल परवाच आमच्या अपार्टमेंट मध्ये काहीतरी योगावरती कार्यक्रम होता. म्हणून एक मुलगा ( साधारण माझ्याच वयाचा) सगळ्यांकडे दोन – दोन तीन – तीन वेळा घरी जाऊन बोलवत होता.  अगदी सर्वसामान्य किंवा म्हटलं तर गरीब घराचा वाटत होता. तस पाहिलं तर फक्त एक दोन सेकंदांसाठी पाहिलं असेन त्याला पण तेवढ पुरेस होत मनाला विचार करायला भाग पडायला. लगेच डोक्यात विचार यायला लागतात.

दोन व्यक्ती समोरासमोर साधारण सारख्याच वयाच्या. तरीही दोघांच्या जगण्यात, आयुष्यात किती फरक असावा. अशी किती लोक असतात जगात ज्यांना दोन वेळच्या पोट भरण्याची भ्रांत असते. आयुष्यात कसलीही शाश्वती नाही. राहायला घर नाही . आता त्या जीवांना पण चांगला आयुष्य जगावस वाटत असणारच ना. पण दैव , नशीब कितीही नाही म्हटलं तरी असतच शेवटी. कोणत्या घरात जन्म घ्यायचा हे काय आपण ठरवतो? आपण चांगल्या घरात जन्म घेतला त्यात आपलं कर्तुत्व ते काय? देवान् दोन हात दोन पाय धडधाकट शरीर दिलय यात आपण कुठे काही केलय. मग इतर काही कम नशिबी माणसाना दुखावण्याचा हक्क आपल्याला दिला कुणी ? तरीही खूप लोक असतात ज्यांना दुसर्याना हिणवायला आवडत. त्यांच्या व्यंगाची टर उडवायला आवडत. पण अशा वेळी स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी तेवून विचार करायला हवा न. खूप लोकांना हे जमतच नाही.

कदाचित सगळ्यांनाच हे जमण शक्य होणार नाही. तस झाल तर या जगात कोणी कोणाला दुखवायच्या आधी कमीत कमी  दहा वेळा तरी विचार करेल. असो, चालायचं.

माणुसकी


‘काही लोकांचा स्वभाव इतका वेगळा असतो न कि कौतुक करावस वाटत. पण कौतुक करण्याइतके आपण अजून मोठे झालो नाही हे लक्षात येत. खर तर अश्या लोकांकडे बघून कळत कि आपण किती खुजे आहोत.’

खूप दिवसांपासून ब्लोग वर काही लिहिले नाही. काय लिहावे ते सुचतच नव्हते. कधी कधी सुचते पण इतक्या भरभर विचार मनात येत जातात कि लिहीयला वेळच मिळत नाही. पण कधी कधी काही घटना अशा घडतात कि लिहावेसे वाटतेच. म्हणून ठरवले कि आधी विचार करून लिहिण्यापेक्षा विचार व लिहिणे बरोबर करावे म्हणजे विचार हरवणार नाहीत.

तर विचार करायला लावणारी घटना जी मला काल परवा माझ्या बाबांनी सांगितली. घटना पुण्याची आहे. छोटीशी आहे. माझे बाबा एका दुकानातून चहा घेऊन जात होते.  तेव्हा त्यांना एक आजोबांनी हात देऊन थांबवले आणि ते म्हणाले कि ‘तिकडे एक भिकारी आहे. मी त्याला खायला वडा पाव दिला. तुम्ही त्याला चहा द्या.’ नंतर बाबांकडून चहा घेऊन ते त्या भिकाऱ्याकडे गेले. सोबत बाबांना पण घेऊन गेले. त्याला चहा दिला व सांगितले कि ह्या साहेबांनी तुला चहा दिला आहे. नंतर त्यांनी सांगितले कि तो भिकारी खर तर एक डॉक्टर होता. पण काही कारणाने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. मी रोज त्याला काही तरी खायला देत असतो.

घटना खूप मोठी नाही. पण विचार करायला लावणारी आहे. माझ्या आईचे वडील माझे आजोबा  (ज्यांना मी कधी पहिले देखील नाही) ते सुद्धा नेहमी एका भिकाऱ्याला जेवू घालायचे.  तो भिकारी नेहमी एका ठरलेल्या वेळेवर यायचा.  त्याला गरम गरम जेवण मिळायचे. माझी आई सांगते आजोबा नेहमी म्हणायचे कि भिकाऱ्याला भीक म्हणून कधी पैसे देऊ नये, अन्न द्यावे.

मी म्हणेल ‘मोठे पण देगा देवा’. पण वयाने नव्हे वृत्तीने.