पुणे


अजून पुण्यात येऊन काही महिनेच होत आहेत आणि खर सांगू पुण्यात असण्याचा आणि पुणेकर म्हणवण्याचा अभिमान वाटायला लागला आहे. का कुणास ठाऊक पण एक समाधान वाटत. पण अजूनही कधी कधी विचार करायला बसले न तर विश्वास बसत नाही कि मी खरच पुण्यात आहे. खरच गेल्या वर्षापर्यंत जे पुण माझ्यासाठी एक स्वप्ना सारख होत त्याच पुण्यात मी राहते यावर विश्वास ठेवण कठीण जात. फार पूर्वीपासून मला पुण्यात येण्याची इच्छा होती. अगदी बारावी नंतर यायचं होत पण शक्य झाल नाही नंतर graduation ची तीन वर्ष काढली नाशकात  आणि ठरवलं कि आता तरी पुण्यातच जायचं pg साठी.खर सांगते त्यावेळी university त शिकायला येण्याची खूप इच्छा होती. शिवाय मी पर्यायी पुण्यातल्या सगळ्या कॉलेजचे forms download करून ठेवले होते (त्यात माझ्या आताच्या कॉलेज चाही form होता.) . पुणे विद्यापीठात नंबर लागतहि होता पण काय करणार नशिबातच नव्हते. पण मी ठरवले आता नाही तर नाही पण दोन वर्षांनी phd करण्यासाठी तरी मी पुण्यातच जाणार काहीही झाले तरीही. पण नशीब बघा एक वर्ष आधीच मला इथे यायला मिळाल आणि तेही अक्षरश ढकलून ढकलून आणालय नशिबाने. पूर्वी माझा नशिबावर इतका विश्वास नव्हता पण गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी माझा खरच विश्वास बसला नशिबावर. घटना अगदी पूर्वी ठरवल्या सारख्या घडत गेल्या.

खर तर आमच्या साठी सोप नव्हत इतकी वर्ष एका शहरात राहिल्यावर तिथल सगळ सोडून एका अगदीच नव्या शहरात राहायला जाण. तेही सगळ बिर्हाड उचलून. आणि आम्ही कधी असा विचारही केला नव्हता कि आम्ही कधी अस करू. पण बाबांची बदली होण् (टाळूनही), माझ पुण्यात यायला तयार होण् आणि आम्ही येथे येण अगदी अशक्य वाटणार, पण ते झाल. मी तयार नव्हते कारण एक वर्ष तिकडे काढून मग इथे सगळ नव्याने करण मला कठीण वाटत होत. पण अस सगळ बदलत गेल कि आम्हाला इथे यावच लागल.

पण इथे येण्याआधी मला सगळ्यांनी घाबरवल होत कि तिथे जाते आहेस पण तुला जमणार आहे का, तिथले लोक म्हणजे पुणेकर लवकर accept करणार नाहीत, तू एकटी पडशील, friends मिळणार नाहीत, वगैरे वगैरे. मी पण जरा घाबरलेच होते पण मग ठरवले कि जाऊ देत. मी माझ काम करीन. कोणी नाही मिळाल सोबत तरी मी एकटी काढीन हे वर्ष कसही. पण नाही, खरच मी collg मध्ये गेल्यावर पहिल्याच दिवशी मला जाणवलं कि सगळे किती चुकीचे होते.  इथल्या लोकांनी मला इतक्या लवकर आणि आपुलकीने accept केल कि मला जाणीवच होऊ दिली नाही कि मी इथे नवीन आहे म्हणून. त्यात मला नशिबाने collg पण इतक चांगल मिळाल. खरच सगळ नशिबानेच होत.

आज जरा मागे जाऊन सगळ्या गोष्टींचा विचार केला कि कळत कि जे होत ते चांगल्यासाठीच होत. मला पुण्यात येऊन जे काही मिळाल आहे ना ते इतक अमुल्य आहे कि ते मी कधीही विसरू शकणार नाही. मला मीच सापडले, उमगले. मला जगण म्हणजे काय ते कळाल. मी आयुष्य जगायला खऱ्या अर्थाने इथे सुरुवात केली. माझी स्वतःची ओळख निर्माण झाली. मी सुद्धा काहीतरी आहे हे माझ मलाच कळल. स्वतः ला सिध्द करण्याची हिम्मत आली. आयुष्य जगण्याची दिशा मिळाली. म्हणून आज पुण्यात असण्याच समाधान वाटत.

Advertisements

उगीचच काहीतरी


आज खूप दिवसांनी खरतर महिन्यांनी मी ब्लोगवर लिहिते आहे. एरवी लिहीत होते पण ते ब्लोगवर उतरवायचा कंटाळा केला. शिवाय बऱ्याच पोस्ट तर तश्याच अर्धवट लिहिलेल्या पडून आहे. पूर्ण केल्याच नाहीत. त्यातले बरेच विषय आता जुनेदेखील झाले. हा लेख पण मी १३ डिसेंबर १० ला लिहिला आहे. पण आज येथे उतरवते आहे तसा चा तसा. लेख घटनेवर आहे म्हणून थोडा विस्कळीत वाटेल कदाचित .

कधी कधी मन फार अस्वस्थ होत. उगाच काहीतरी विचार करत बसत. सगळ्याच गोष्टींचा अर्थ कळेनासा होतो. कोणत्याच गोष्टीवर आपला म्हणावा तसा हक्क नाही अस वाटत. आणि मनाला काय अगदी साधी छोटी घटना देखील पुरते विचार करायला. अशीच घटना म्हणजे – काल परवाच आमच्या अपार्टमेंट मध्ये काहीतरी योगावरती कार्यक्रम होता. म्हणून एक मुलगा ( साधारण माझ्याच वयाचा) सगळ्यांकडे दोन – दोन तीन – तीन वेळा घरी जाऊन बोलवत होता.  अगदी सर्वसामान्य किंवा म्हटलं तर गरीब घराचा वाटत होता. तस पाहिलं तर फक्त एक दोन सेकंदांसाठी पाहिलं असेन त्याला पण तेवढ पुरेस होत मनाला विचार करायला भाग पडायला. लगेच डोक्यात विचार यायला लागतात.

दोन व्यक्ती समोरासमोर साधारण सारख्याच वयाच्या. तरीही दोघांच्या जगण्यात, आयुष्यात किती फरक असावा. अशी किती लोक असतात जगात ज्यांना दोन वेळच्या पोट भरण्याची भ्रांत असते. आयुष्यात कसलीही शाश्वती नाही. राहायला घर नाही . आता त्या जीवांना पण चांगला आयुष्य जगावस वाटत असणारच ना. पण दैव , नशीब कितीही नाही म्हटलं तरी असतच शेवटी. कोणत्या घरात जन्म घ्यायचा हे काय आपण ठरवतो? आपण चांगल्या घरात जन्म घेतला त्यात आपलं कर्तुत्व ते काय? देवान् दोन हात दोन पाय धडधाकट शरीर दिलय यात आपण कुठे काही केलय. मग इतर काही कम नशिबी माणसाना दुखावण्याचा हक्क आपल्याला दिला कुणी ? तरीही खूप लोक असतात ज्यांना दुसर्याना हिणवायला आवडत. त्यांच्या व्यंगाची टर उडवायला आवडत. पण अशा वेळी स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी तेवून विचार करायला हवा न. खूप लोकांना हे जमतच नाही.

कदाचित सगळ्यांनाच हे जमण शक्य होणार नाही. तस झाल तर या जगात कोणी कोणाला दुखवायच्या आधी कमीत कमी  दहा वेळा तरी विचार करेल. असो, चालायचं.

अलविदा… असं म्हणू नये


सगळ्यात आधी sorry अनिकेत दादा तुझ्या post चे heading वापरल्याबद्दल. आणि खर तर विषयसुद्धा तोच आहे. फक्त उद्देश वेगळा आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जो धक्का अनिकेत दादा ने दिला त्यामुळे मला हि पोस्ट लिहावीशी वाटली.

सगळ्यात आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कि तुम्ही blogging का करता? मी प्रश्न विचारला म्हणजे पहिले मी उत्तर द्यायला हवं. माझं उत्तर असं कि खूप वर्षांपासून मला माझी डायरी लिहावी अस मनापासून वाटायचं पण लिहायचा कंटाळा यायचा. विचार एकदा मनात यायला लागले कि ते ब्रेक नसलेल्या, फुल स्पीड ने धावणाऱ्या गाडीसारखे सुटतात. मग या विचारांवर कुणाच तरी मत हवं असत. पण खर सांगू आपले हे विचार ऐकायला कुणीही तयार होत नसत. सगळ्यांना bore होत  आणि म्हणतात पकवू नकोस, please!! त्यांच्या या विनंती वजा आदेशाचा मन राखून आपली ढाल तलवार मागे घ्यावी(च) लागते.

अशातच मला अगदी अनपेक्षितपणेच काही मराठी ब्लोग वाचायला मिळाले. मला ते वाचायला खूप आवडले. मग विचार केला कि आपण आपले विचार, अनुभवच ब्लोग वर का लिहू नये? (तसा ब्लोग आधीपासूनच सुरु केला होता पण काही लिहिले नव्हते.) सगळ्यात महत्वाच म्हणजे इथे कोणाला वाचायला आवडलं तर ते वाचतील, नाही आवडलं तर निघून जातील पण रागावणार नाहीत, कोणी टोकणार नाही. झाल्याच तर ओळखी होतील. मागेही कुठेतरी वाचल होत कि ब्लोग हि कल्पना personal डायरी वरूनच सुचली होती म्हणून.

तर मूळ मुद्दा राहिलाच बाजूला. मी जेव्हा माझ्या पप्पांना ब्लोग  लिहायला सांगितला तेव्हा तेव्हा माझ्या मनात होत कि त्यांना सुद्धा आपल्या मनातले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. पण जेव्हा त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि ब्लोग वाचला जाऊ लागला तेव्हा रोज पोस्ट लिहिलीच पाहिजे असं जणू अलिखित नियमच झाला. ब्लोग fastest growing च्या लिस्ट मध्ये आला पाहिजे,रंकिंग मध्ये वर गेला पाहिजे वगैरे वगैरे असे त्यांना वाटू लागले. ब्लोग्गिंग एक व्यसन होऊ लागले.

पण खर सांगू मला हे नाही पटत. माझ्या मते ब्लोग हा आपल मन मोकळ करण्यासाठी, लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. पण ते व्यसन बनता कामा नये. ब्लोगवरील नकाशावर किती dots आहेत, वाचकांची संख्या किती आहे यापेक्षा लोक तुमचा ब्लोग किती आवडीने वाचतात, त्यांना तुमचे विचार किती पटतात हे जास्त महत्वाच आहे. आताच महेंद्र काकांच्या ब्लोगची वाचकसंख्या लाखाच्या वर पोहोचली, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. पण मला वाटत कि त्यांच्या वाचकांचा आकडा नुसता visitors नि फुगलेला नसून त्यात सारे खरे मनापासून दाद देणारे वाचक आहेत आणि हेच जास्त महत्वाचेआहे.

सरतेशेवटी माझ  हेच म्हणण आहे कि please ब्लोग लिहिणे बंद करून आपल्या नियमित वाचकांना धक्का देऊ नका.

Blogging must be your Hobby, but not your Passion.

तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा