MJ forever…


“Before you judge me , try hard to love me, look within your heart, then ask…
Have you seen my childhood?”

TheEssentialMichaelJackson

खूप दिवसांपासून MJ बद्दल लिहावं अस वाटत होत. काही दिवसांनंतर त्याचा जन्मदिवस येतोय म्हणून आज लिहिते आहे.

काय लिहावं आणि कशी सुरुवात करावी खरच कळत नाहीय. पण मी पण इतरांसारखीच सुरुवात करते कि त्याच्या मृत्यूआधी कधीच त्याची गाणी ऐकली नव्हती किंवा त्याचा Moonwalk or Robot dance पहिला नव्हता वगैरे वगैरे ..आता त्याची बरीचशी गाणी ऐकली आहेत आणि अजून भरपूर गाणी ऐकायची आहेत. पण खरं सांगू मला वाटत त्याची गाणी ऐकण्यापेक्षा वाचण्यासारखी आहेत. समजून घेण्यासारखी आहेत. ती गाणी वाचून असा मुळीच वाट नाही कि इतका sensitive माणूस ‘असं’ काहीतरी करू शकेल.

त्याच्या मृत्यूआधी त्याच्याकडे कधीच लक्ष न देण्याच मोठ कारण असं सांगता येइल कि media ने त्याच्याबद्दल फक्त negative गोष्टीच समोर आणल्या. खर सांगते मला त्याच्याबद्दल जे काही माहित होत ते फक्त त्याच्या black to white journey बद्दल किंवा त्याच्या अनंत (?) plastic surgeries बद्दल,’त्या’ cases बद्दल नी स्वतःच्या मुलाला बाल्कनीतून लटकावाल्याबद्दल. त्यामुळे तो फारच विक्षिप्त आहे अस वाटायला लागल होत आणि त्यात तो आपल्यासारखाच (? नसेलही कदाचित ) एक माणूस आहे हि भावनाच पुसली गेली होती. पण इतकं असूनही त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर धक्काच बसला.

खरं तर मला celebrities च्या life मध्ये फार काही interest नसतो आणि नसावाच. त्यातून याच्याशी तर काहीच संबंध नव्हता. तरीही ती बातमी वाचून जो धक्का बसला होता तो वेगळाच होता. म्हणजे काय वाटत होतं तेच कळत नव्हत. yahoo home page वर त्याचा photo पाहिला आणि first thought होता हा कोणत्या तरी गोष्टीत पुन्हा अडकला असेल. म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण नंतर dies शब्द वाचला आणि चमकली. सगळी बातमी वाचली पण विश्वास बसला नाही. दुसरी reaction होती काय ? शक्यच नाही. लगेच PC बंद केला आणि news channel बघितला. खर होत ते आणि मी नंतर blank होते completely blank !!

नंतर त्याच्याबद्दल खूप news ऐकल्या, लेख वाचले.तो खूप एकलकोंडा होता, कधीही भावना अनावर होऊन रडायचा. कुतूहल जाग झालं आणि मनापासून वाटलं बघावा खरच कसा होता तो? you tube ,Wikipedia वर बघितलं आणि खूप गोष्टी कळल्या. तसच त्याच्या Heal the world foundation बद्दलही कळलं.

त्याचे interviews त्याचे आणि त्याच्या मुलांचे videos बघितले.त्याच्या मार्टिन बशीर बरोबरच्या interview मध्ये तो रडताना दिसतो. याच interview मध्ये तो paris ला(त्याच्या मुलीला) म्हणतो,” Don’t you want to run like your brother ?” ती म्हणते, ” No, I want to hold your hand.” आणखी ऐका video मध्ये तिला विचारला होतं,”What do you want to be when you grow up?” & she said ” I want to be like my Dady.” ‘Living with Michael Jackson’ मध्ये तो म्हणत असतो, ” I wanted to call my father Dady and he didn’t allowed me, so I tell my children to call me dady . I am not Michael I am your dady.” ईतका sensitive होता तो !

आणि त्याच्या बद्दल बोलाव तर त्याच्या songs च्या lyrics बद्दल बोलावंच लागेल नाहीतर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल.मी इतकंच म्हणेल कि त्याची गाणी वाचा.
Heal The world
Childhood(त्याने म्हणे कोणत्यातरी interview मध्ये म्हटलं होता कि माझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर हे गाण ऐका.)
Man in the mirror
what more can I give
smile
will you be there
another part of me
jam
earth song
we are the world
and many more…

Any ways, he was not only a good singer, dancer but also a good human being.

कुठे तरी एक छान comment छान वाचली होती

‘ Hay God …My Michael is with you. Please take care of my Angel.’

You can refer the link to read and listen his songs.

Advertisements
Posted in MJ | Tagged